For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुतगा येथे साडेतीन लाखाची घरफोडी

06:32 AM Sep 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
मुतगा येथे साडेतीन लाखाची घरफोडी
Advertisement

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisement

बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम अशा एकूण 3 लाख 60 हजार किमतीच्या ऐवजावर डल्ला मारला आहे. बसव कॉलनी, साईनगर, मुतगा येथे ही घटना घडली आहे. याप्रकरणी मंगळवार दि. 22 रोजी अनुसूया सदाशिव सजली यांनी मारिहाळ पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करून घेत तपास चालविला आहे.

फिर्यादी अनुसूया या गुरुवार दि. 17 रोजी सकाळी 11 च्यादरम्यान आपल्या घराला कुलूप लावून बाहेर गेल्या होत्या. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या घरच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. बेडरुममधील ट्रेझरीमध्ये ठेवण्यात आलेले पावणे दोन लाख किमतीचे 12 ग्रॅम वजनाचे बोरमाळ, 8 ग्रॅम वजनाची सव्वा लाख रुपयांची सोन्याची अंगठी, 60 हजार रुपयांची रोकड व इतर साहित्यावर डल्ला मारला.

Advertisement

चोरट्यांनी तब्बल 3 लाख 60 हजार रुपयांचा ऐवज पळविण्यात आल्याची घटना सोमवार दि. 21 रोजी दुपारी 3 च्या सुमारास उघडकीस आली. सदर माहिती मारिहाळ पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. फिर्यादी अनुसूया यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement
Tags :

.