For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उज्ज्वलनगरात अडीच लाखांची घरफोडी

06:22 AM Sep 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
उज्ज्वलनगरात  अडीच लाखांची घरफोडी
Advertisement

माळमारुती पोलिसात चोरीची नोंद

Advertisement

बेळगाव : एका बंद घराच्या पाठीमागच्या दरवाजाची आतील बाजूची कडी उचकटून सुमारे 2 लाख 54 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने पळविण्यात आले आहेत. उज्ज्वलनगर येथे ही घटना घडली असून माळमारुती पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे. हजरत अली यांनी माळमारुती पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. दोन दिवसांपूर्वी चोरीची ही घटना घडली असून घराला कुलूप लावून हजरत अली व त्यांचे कुटुंबीय परगावी गेले असता पाठीमागच्या दरवाजाची आतील कडी तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने पळविले आहेत. हा प्रकार उघडकीस येताच माळमारुती पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे. चोरट्यांनी तिजोरीतील 2 लाख 54 हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने पळविले आहेत. माळमारुती पोलीस पुढील तपास करीत आहेत. शहर व उपनगरात चोऱ्या, घरफोड्या वाढल्या आहेत. गणेशोत्सवाच्या तोंडावर सुरू झालेल्या चोरीच्या सत्रामुळे नागरिक भयभीत झाले आहेत.

Advertisement
Advertisement

.