Kolhapur theft | कोल्हापुरात तासात घरफोडी; 2 तोळ्याचे मंगळसूत्र लंपास
कोल्हापुरात बंद घरफोडी
कोल्हापूर: बंद घरावर पाळत ठेवून एकातासात २ तोळे दागिने आणि रोख ३० हजार रुपये चोरट्याने लंपास केले. बुधवारी (८ एप्रिल) रोजी सकाळी १० ते ११ वाजण्याच्या सुमारास मुक्त सैनिक वसाहत परिसरात ही घटना घडली. याबाबतची फिर्याद संतोष बिरु यमकर (वय ४४ सध्या रा. मुक्त सैनिक वसाहत, मूळ रा. गगनबावडा) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, संतोष यमकर हे पत्नी, मुलगी, मुलासह मुक्त सैनिक वसाहत येथे सावंत यांच्या घरी भाड्याने राहतात.बुधवारी सकाळी १० वाजता संतोष कामासाठी बाहेर गेले होते, तर त्यांच्या पत्नीही कामानिमित्त घराबाहेर गेल्या होत्या. १२ वाजता त्या परत आल्या असता, त्यांना घराचा मुख्य दरवाजा उघडा दिसला.
त्यांनी आतमध्ये जाऊन पाहिले असता, भांड्याच्या रॅकमध्ये अॅ ल्युमिनियमच्या डब्यात ठेवलेले २ तोळ्याचे मंगळसूत्र आणी रोख ३० हजार रुपये असा सुमारे २ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल नसल्याचे दिसून आले. शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. अधिक तपास पोलीस नाईक चंद्रशेखर बाटुंगे करत आहेत.