For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Ichalkaranji Crime : इचलकरंजीत घरफोडी, सहा लाखांचे साहित्य लंपास

01:09 PM Dec 29, 2025 IST | NEETA POTDAR
ichalkaranji crime   इचलकरंजीत घरफोडी  सहा लाखांचे साहित्य लंपास
Advertisement

                                                       इचलकरंजीत धाडसी घरफोडी

Advertisement

इचलकरंजी : इचलकरंजीत शहरातील गजबजलेल्या स्टेशन रोडवरील एका प्लंबिंग साहित्याच्या दुकानात अज्ञात चोरट्यांनी धाडसी घरफोडी करत तब्बल ६ लाख ३६ हजार २५५ रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दुकानमालक किशोर रवीलाल पटेल (वय ४३, रा. गणेशनगर, इचलकरंजी) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

ही चोरी शुक्रवार रात्री ८ वाजल्यापासून शनिवारी सकाळी घडली.याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, स्टेशन रोडवरील श्री जलाराम ट्रेडर्स दुकान बंद केल्यानंतर चोरट्यांनी गोदामाच्या उत्तर बाजूचा लोखंडी पत्रा कापून आत प्रवेश केला. विशेष म्हणजे, महागडे आणि अवजड प्लंबिंग साहित्यच नेमके लक्ष्य करण्यात आले. यात विविध कंपन्यांचे पितळी नंळ, फ्लश कॉक, स्पाऊट यांसह तब्बल ३६० हून अधिक नग चोरट्यांनी उचलले.

Advertisement

दुकान उघडताना गोदामाचा पत्रा कापलेला दिसताच पटेल यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून श्वान पथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, चोरट्यांचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Advertisement
Tags :

.