For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur Crime | गडहिंग्लज तालुक्यात घरफोडी; १७ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

11:56 AM Feb 25, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur crime   गडहिंग्लज तालुक्यात घरफोडी  १७ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास
Advertisement

                                 हलकर्णी-नांगनूरमध्ये दिवसाढवळ्या चोरी

Advertisement

हलकर्णी - नांगनूर येथील अभिषेक कुमार तेरदाळे यांच्या राहत्या घरात प्रवेश करून अज्ञाताने अंदाजे १७ लाख किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना सोमबार सकाळी घडली. या घटनेची अभिषेक कुमार तेरदाळे यांनी गडहिंग्लज पोलिसात बर्दी दिली असून गडहिंग्लज पोलिसात घटनेची नोंद झाली आहे.

तेरदाळे कुटुंबीय सकाळी शेतावर कांदा कापणीसाठी गेले होते. घरी वृध्द आजी आकब्बा, आजोबा साताप्पा होते. साताप्पा जेवण करून गावात प्रवेश करणाऱ्या रस्त्यावरील कट्ट्यावर बसायला गेले होते. आकव्वा भांडी धुण्यासाठी गेली होती. दरम्यानच्या काळात चोरट्याने अभिषेक तेरदाळे यांच्या राहत्या घराच्या उघड्या दरवाज्यातून आत प्रवेश केला. खोलीतील लोखंडी तिजोरीचा दरवाजा उघडून तिजोरीतील डब्यातून अंदाजे ४ तोळे वजनाची सोन्याची गोल मनी असलेली तीन पदर मोहनमाळ, २ तोळे वजनाची सोन्याची बोरमाळ, दीड तोळे वजनाची सोन्याची चेन, अडीच तोळे वजनाचे गंठण असा सुमारे १७ लाख किमतीचा ऐवज लंपास केला.

Advertisement

आकव्वा भांडी धुतल्यानंतर आपल्या खोलीत गेली असता तिला तिजोरी उघडी असल्याचे निदर्शनास आले. दागिने ठेवलेला पितळी डबा बाहेर असल्याचे दिसले. डबा उघडून पाहिले असता त्यांना दागिने आढळून आले नाहीत. आकब्याने शेजारी धाव घेतली. कांदा काढणीस गेलेल्या नातेवाईकांना घडलेली घटना सांगून घरी बोलावून घेतले. ठसे तज्ञांनी घटनास्थळी भेट देऊन ठसे घेतले.

Advertisement
Tags :

.