महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

फेजीवडे येथे भरदिवसा घरफोडी; तीन तोळे सोने लंपास

02:01 PM Jun 15, 2024 IST | Abhijeet Khandekar
Fejiwade gold lumpas
Advertisement

राधानगरी / प्रतिनिधी

राधानगरी तालुक्यातील फेजिवडे येथे राधानगरी धरणाच्याशेजारी असलेल्या नाळवा वसाहतीमध्ये वाशिम अब्बास शेख हे आपली पत्नी आणि दोन मुलासह राहतात.ते आज सकाळी आठ वाजता ते खाजगी नोकरीसाठी कामावर गेले तर पत्नी मुलांना घेऊन त्यांच्या जुन्या घरी गेल्या असताना याचा अंदाज घेऊन दुपारच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी पुढील दरवाज्याचा कुलूप तोडून घरात प्रवेश करत बेडरूमचा कडीकोयंडा तोडून आत मधील तिजोरी फोडली. तिजोरीमधील सुमारे तीन तोळे दागिने लंपास केल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे.

Advertisement

चोरीला गेलेल्या दागिन्यांमध्ये दीड तोळ्याचा सोन्याचा लप्पा आणि दीड तोळ्याचं गंठन असा एकूण एक लाख पन्नास हजाराचा मुद्देमाल लंपास केला आहे, या बाबतची तक्रार वाशीम शेख यांनी राधानगरी पोलिसात केलीय. भरदिवसा घरफोडी केल्यामुळे नागरिकांत घबराट निर्माण झाली आहे, अधिक तपास राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णात यादव, गुरव हे तपास करत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :
BurglaryFejiwadegold lumpas
Next Article