For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शहापूरमधील अपार्टमेंटमध्ये घरफोडी

11:26 AM Nov 20, 2023 IST | Tarun Bharat Portal
शहापूरमधील अपार्टमेंटमध्ये घरफोडी
Advertisement

बंद फ्लॅटचा कडीकोयंडा तोडून सव्वाचार लाखाचा ऐवज लांबविला

Advertisement

बेळगाव : बंद फ्लॅटचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी सुमारे सव्वाचार लाख रुपयांचा ऐवज पळविला आहे. शनिवार दि. 18 नोव्हेंबर रोजी सकाळी भारतनगर, शहापूर येथील अरिहंत अपार्टमेंटमध्ये चोरीची ही घटना उघडकीस आली आहे. रविवारी दिलीपकुमार ताराचंद शहा यांनी शहापूर पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. दि. 30 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री आपल्या कुटुंबीयांसमवेत ते बेंगळूरला गेले होते. शनिवारी सकाळी 11.30 वाजता बेंगळूरहून आपल्या फ्लॅटवर परतले, त्यावेळी चोरीचा प्रकार उघडकीस आला. चोरट्यांनी बंद फ्लॅटचा कडीकोयंडा तोडून कपाटातील 46 ग्रॅम सोन्याचे दागिने, 495 ग्रॅम चांदी व 1 लाख 53 हजार रुपये रोकड पळविली आहे. घटनेची माहिती समजताच शहापूरचे पोलीस निरीक्षक एस. एस. सिमानी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली. रविवारी दुपारी शहापूर पोलीस स्थानकात यासंबंधी एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.