Kolhapur News : कागल तालुक्यात देवकार्याच्या वेळी घरफोडी; १६ लाखांचा ऐवज लंपास
कागलमध्ये मोठी घरफोडी
कागल : पिंपळगाव खुर्द, ता. कागल येथे घराच्या दारात देवकार्य सुरू असतानाच अज्ञात चोरट्यांनी संधी साधून घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १६ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला - आहे. देवकार्य संपल्यानंतर घरात चोरी झाल्याचे सर्वांच्या निदर्शनास आले असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. संतोष सत्यपा दानवाडे (रा. आवटे मळा, पिंपळगाव खर्द) यांच्या घरी ही चोरीची घटना घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सत्यपा दानवाडे यांच्या घरासमोर देवकार्य सुरू होते. घरातील सर्व सदस्य व नातेवाईक देवकार्यामध्ये व्यस्त होते. - त्याचवेळी चोरट्यांनी घरात प्रवेश करून घरातील मधल्या माळ्यावर असलेल्या तिजोरीच्या लॉकरमधील पाच लाख रुपये किमतीचा सोन्याचा कोल्हापुरी साज, चार लाख रुपये किमतीचा लक्ष्मीहार, चार लाख रुपये किमतीचे - सोन्याचे गंठण, तीन लाख रुपये किमतीचा नेकलेस आणि पंधरा हजार रुपये रोख रक्कम असा १६ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून अज्ञात चोरट्यांविरोधातपिंपळगाव खुर्द चोरट्यांनी तिजोरीतील साहित्य असे अस्ताव्यस्त टाकले होते.
गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास सुरू असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. देवकार्याच्या निमित्ताने घरांमध्ये मोठी वर्दळ असताना घडलेल्या या चोरीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.