महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

देसूर भागात बससेवेचा बोजवारा : परिवहनचे दुर्लक्ष

11:20 AM Jul 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ : अपुऱ्या अनियमित बसफेरीचा फटका : विद्यार्थ्यांना करावा लागतोय लोंबकळत प्रवास, परिवहन खात्याचे दुर्लक्ष

Advertisement

वार्ताहर/किणये

Advertisement

देसूर भागात बससेवेचा बोजवारा उडाला आहे. या परिसरात अपुऱ्या व अनियमित बसफेऱ्या असल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजला ये-जा करताना बसथांब्यावर तासन्तास ताटकळत बसावे लागत आहे. तसेच बसमध्ये प्रवाशांची संख्या अधिक असल्यामुळे व बाहेरगावावरून येणाऱ्या बस आधीच प्रवाशांनी पूर्णपणे भरून येत असल्यामुळे देसूर गावातील विद्यार्थ्यांना बसमध्ये चढताना बरीच कसरत करावी लागत आहे. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना लोंबकळत प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे हा विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. याकडे परिवाहन खात्याचे दुर्लक्ष झाले असल्याच्या तक्रारी या भागातील विद्यार्थी व पालकांमधून होत आहेत. देसूर गावातील विद्यार्थी व प्रवाशांना नंदीहळळी व गर्लगुंजी या बसवर अधिक प्रमाणात अवलंबून राहावे लागते. मात्र या बस त्या गावावरूनच प्रवाशांनी भरून येतात. त्यामुळे देसूर गावातील विद्यार्थ्यांना आणि प्रवाशांना बसमध्ये जाण्यासाठी जागाच शिल्लक नसते, अशी माहिती काही विद्यार्थ्यांनी दिली आहे.

मच्छे-झाडशहापूरमार्गे देसूर गावाला सकाळच्या वेळेत एक बस फेरी येते. मात्र सव्वा आठ ते साडेआठ या दरम्यानची ही बस असून ही बस वेळेत येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा व कॉलेजला जाण्यासाठी उशीर होऊ लागला आहे. देसूर गावातील विद्यार्थी बेळगावमधील हायस्कूल व कॉलेजला मोठ्या संख्येने जातात. मात्र गावात बसफेरी वेळेवर नसल्यामुळे त्यांचे शाळा व कॉलेजला जाण्याचे व येण्याचे वेळापत्रक कोलमडून जाऊ लागले आहे. सकाळी ऐन हायस्कूल व कॉलेजला जाण्यासाठी वेळेत बसफेरी नसल्यामुळे हायस्कूल व कॉलेजला वेळेवर विद्यार्थ्यांना पोचताना बरीच कसरत करावी लागत आहे. बरेचसे विद्यार्थी वेळेत कॉलेजला जात नसल्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ लागले आहे, असे पालकांचे म्हणणे आहे.

देसूर गावाला येळळूरमार्गे ही बसफेऱ्या येतात. मात्र या बसफेऱ्या वडगाव-शहापूरमार्गे बेळगावला जातात. त्यामुळे आरपीडी परिसरातील शाळा कॉलेजला विद्यार्थ्यांना जाणे अवघड बनलेले आहे. वडगाव भागातील बसमधून आल्यानंतर बरेच अंतर वडगावला उतरून त्यांना आरपीडी कॉलेजपर्यंत चालत जावे लागत आहे. या गावातील सुमारे 200 हून अधिक विद्यार्थी रोज बेळगावला हायस्कूल व कॉलेजला येतात. मात्र त्यांना हायस्कूल कॉलेजला जाण्यासाठी वेळेवर बस नसते. याचा फटका साहजिकच त्यांच्या अभ्यासावर होऊ लागला आहे. कारण आठवड्यातून तीन-चार दिवस तरी वेळेत पोहोचता येत नाही, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे विद्यार्थी वर्ग वैतागून गेलेले आहेत.

विद्यार्थ्यांना बसमधून लोंबकळत जाण्याचा प्रकार

देसूर गावात सकाळच्या वेळेमध्ये अपुऱ्या व अनियमित बसफेऱ्या आहेत. याचा सर्वाधिक फटका विद्यार्थीवर्गाला बसत आहे. अन्य गावावरून येणाऱ्या बसेस प्रवाशांनी आधीच भरून येतात. त्यामुळे देसूरमधील विद्यार्थ्यांना सदर बसमध्ये जागा मिळत नाही. विद्यार्थ्यांना बसच्या पायऱ्यांवर थांबून लोंबकळत जावे लागत आहे. मोठी दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण? असा सवालही उपस्थित होऊ लागला आहे. तसेच गेल्या चार वर्षांपूर्वी देसूर गावातील एक विद्यार्थी बसच्या चाकाखाली सापडून ठार झालेला आहे. अशाप्रकारची घटना पुन्हा होऊ नये यासाठी परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी या गावाकडे लक्ष देण्याची गरज आहे. आणि गावाला वेळेत आणि सुरळीत बस सुरू करण्याची आवश्यकता आहे.

- रघुनाथ सावंत-देसूर

 वेळेवर बस नसल्याने आम्ही कॉलेजला जायचे कसे?

सकाळी कॉलेजला जाण्याच्या वेळेत गावात एकही बस वेळेवर येत नाही. मग आम्ही कॉलेजला जायचे कसे? असा प्रश्न आमच्यासमोर उभा आहे. बसफेरी अभावी कॉलेजला वेळेवर जाऊन पोहोचत नाही. याचा फटका आमच्या अभ्यासावर होऊ लागला आहे. तसेच वडगाव येळळूरहून येणाऱ्या बसमुळे टिळकवाडी परिसरातील कॉलेजला जाणे मुश्कील आहे. कारण वडगावमध्ये बस थांब्यावरती उतरल्यानंतर बरेच अंतर चालून जावे लागत आहे. परिवाहन खात्याच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रयत्न करावेत.

-सोहम नाईक- विद्यार्थी

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article