संजू परब यांचे समर्थक बंटी पुरोहित शिवसेनेत दाखल
11:51 AM Feb 28, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
सावंतवाडी । प्रतिनिधी
Advertisement
भाजप युवा मोर्चाचे जिल्हा चिटणीस व माजी नगराध्यक्ष संजू परब यांचे खंदे समर्थक बंटी पुरोहित यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना नेते व आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले.जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांच्या हस्ते श्री. पुरोहित यांचे औपचारिक स्वागत झाले. यापूर्वी श्री. परब यांनी जाहीर केले होते की, शिवसेनेत सामील होणाऱ्या आपल्या समर्थकांना पक्षात प्रवेश दिला जाईल आणि त्याचाच भाग म्हणून बंटी पुरोहित यांचा प्रवेश झाला.यावेळी आमदार निलेश राणे, आनंद शिरवलकर, प्रेमानंद देसाई यांच्यासह शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बंटी पुरोहित यांचा शिवसेनेत प्रवेश झाला.
Advertisement
Advertisement