बुमराहचे पुनगरामन, मुंबईला दिलासा
वृत्तसंस्था/ मुंबई
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरविऊद्धच्या इंडियन प्रीमियर लीग सामन्यापूर्वी संघात सामील झाल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला. मुंबई इंडियन्सने रविवारी सोशल मीडियावर बुमराहसंबंधीची घोषणा केली. जानेवारीच्या सुऊवातीला बुमराहला सिडनी येथे ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात पाठीची दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला इंग्लंडविऊद्धच्या मायदेशातील मर्यादित षटकांच्या मालिकेला आणि त्यानंतरच्या चॅम्पियन्स ट्रॉफीला मुकावे लागले होते.
जानेवारीपासून बेंगळूर येथील सेंटर ऑफ एक्सलन्स येथे सावरणाऱ्या बुमराहला बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाकडून वैद्यकीय मंजुरी मिळाल्यानंतर त्याचे पुनरागमन झाले आहे. आता तो महेला जयवर्धनेच्या नेतृत्वाखालील मुंबईच्या सपोर्ट स्टाफसोबत चर्चा करून मैदानात पुन्हा उतरण्यासंदर्भात योजना आखेल. 4 एप्रिल रोजीच्या बुमराहबद्दलच्या शेवटच्या माहितीवरून असे वाटत होते की, फिटनेस चाचण्यांच्या शेवटच्या फेरीवर त्याचे पुनरागमन अवलंबून असल्याने तो किमान आरसीबीविरुद्धच्या सामन्याला मुकेल. गेल्या काही आठवड्यांपासून त्याने बीसीसीआयच्या वरील केंद्रात आपल्यावरील गोलंदाजीचा भार हळूहळू वाढवला आहे आणि सर्व आवश्यक फिटनेस चाचण्या पार केल्यानंतरच त्याला मुंबईच्या संघात सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे.