For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बुमराहचे वर्चस्व संपले, अव्वलस्थानावरुन पायउतार

06:13 AM Aug 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
बुमराहचे वर्चस्व संपले  अव्वलस्थानावरुन पायउतार
Advertisement

आयसीसी कसोटी रँकिंग : आता, मिचेल स्टार्क नं . 1

Advertisement

वृत्तसंस्था/ दुबई

आयसीसीच्या ताज्या कसोटी गोलंदाजी क्रमवारीत मोठा उलटफेर झाला असून भारताचा दिग्गज वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचे अव्वल स्थान हिरावले गेले आहे. बांगलादेशविरुद्धच्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क प्रथमच जगातील नंबर-1 कसोटी गोलंदाज बनला आहे. विशेष म्हणजे, बुमराह जवळपास दोन वर्षे अव्वल क्रमांकावर कायम होता. मात्र तो दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकल्याने आता त्याच्या वर्चस्वाला धक्का लागला आहे.

Advertisement

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज मिचेल स्टार्कने कसोटी गोलंदाजी क्रमवारीत अव्वल क्रमांक मिळवला आहे. स्टार्कने कसोटीमध्ये गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल क्रमांक कारकिर्दीत पहिल्यांदाच मिळवला आहे. बांगलादेशविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात 10 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता, याचा फायदा त्याला क्रमवारीत झालेला आहे. दुसरीकडे, बुमराह सध्या 862 गुणासह दुसऱ्या स्थानी असून न्यूझीलंडचा मॅट हेन्री 861 गुणासह तिसऱ्या स्थानावर आहे. याशिवाय, ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सही 2 सामन्यांत 7 विकेट घेत पाचव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर आला आहे.

बुमराहची घसरण

बुमराह आता 862 गुणासह दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. स्टार्कपेक्षा 10 गुणांनी बुमराह मागे आहे. गेल्या नोव्हेंबरपासून त्याने एकही कसोटी सामना खेळलेला नाही. अफगाणिस्तानविरुद्धचा सामना न खेळणे आणि दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकावे लागणे, याचा थेट फटका त्याच्या रँकिंगला बसला आहे. कसोटी क्रमवारीच्या पहिल्या 15 गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह हा एकमेव भारतीय गोलंदाज उरला आहे. दुसरीकडे, मोहम्मद सिराज 18 व्या तर रविंद्र जडेजा 19 व्या स्थानावर आहे.

फलंदाजीत इंग्लंडचा हॅरी ब्रूक अव्वलस्थानी

दरम्यान, कसोटी फलंदाजी क्रमवारीत इंग्लंडचा स्टार फलंदाज हॅरी ब्रूक अव्वल क्रमांकावर तर जो रुट दुसऱ्या क्रमांकावर कायम आहेत. याशिवाय, ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ तिसऱ्या, ट्रॅव्हिस हेड चौथ्या क्रमांकावर आहेत. भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतने श्रीलंकेविरुद्ध कसोटीत शानदार कामगिरी केली आहे. या खेळीचा त्याला आयसीसी क्रमवारीत फायदा झाला आहे. पंतने सहा स्थानांची झेप घेत संयुक्तपणे सातवे स्थान पटकावले आहे. शुभमन गिल देखील सातव्या क्रमाकांवर आहे.

Advertisement
Tags :

.