महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

यशस्वी-विराटच्या शतकानंतर बुमराह-सिराजचा धुमाकूळ

06:58 AM Nov 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कांगारुंना विजयासाठी दिले 534 धावांचे टार्गेट : तिसऱ्या दिवसअखेरीस यजमानांना तीन धक्के

Advertisement

वृत्तसंस्था/ पर्थ

Advertisement

‘ये नया भारत है, घर में घुसकर मारता है’ या उरी हिंदी चित्रपटातील डायलॉगप्रमाणे टीम इंडियातील युवा खेळाडूंनी ऑस्ट्रेलियन संघाला मायदेशात जोरदार दणका दिला आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ पाहिला तर असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने आतापर्यंत वर्चस्व राखले आहे, ज्यामध्ये त्यांनी ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरच्या मैदानावर बॅकफूटवर ढकलले आहे.

नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर पहिल्या डावात भारतीय संघ 150 धावांत ऑलआऊट झाला होता, त्यानंतर त्यांनी ऑस्ट्रेलियन संघाला 104 धावांत गुंडाळले. यशस्वी जैस्वाल व विराट कोहली यांच्या धमाकेदार शतकी खेळीच्या जोरावर भारताने 6 बाद 487 धावा करत आपला दुसरा डाव घोषित केला व कांगारुंना विजयासाठी 534 धावांचे टार्गेट दिले. विजयी आव्हानाचा पाठलाग करताना जसप्रीत बुमराह व मोहम्मद सिराज यांनी कांगारुंना लागोपाठ तीन धक्के दिले. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाने 4.2 षटकांत 3 बाद 12 धावा केल्या होत्या. आता, पहिली कसोटी जिंकण्यासाठी टीम इंडियाला केवळ 7 विकेट्सची गरज आहे.

यशस्वीचे शानदार दीडशतक

तिसऱ्या दिवशी जैस्वाल व केएल राहुल यांनी बिनबाद 172 धावसंख्येवरुन पुढे खेळायला सुरुवात केली. या दोघांनी पहिल्या विकेट्साठी द्विशतकी भागीदारी करताना दमदार फलंदाजी केली. डावातील 63 व्या षटकांत स्टार्कने राहुलला बाद करत ही जोडी फोडली. राहुलने 5 चौकारासह 77 धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली. राहुल बाद झाल्यानंतर जैस्वालने आपले चौथे कसोटी शतक पूर्ण केले. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा सामना करताना त्याने 297 चेंडूत 15 चौकार व 3 षटकारासह 161 धावांची खेळी साकारली. मार्शने त्याला बाद करत ऑस्ट्रेलियाला मोठे यश मिळवून दिले. जैस्वाल बाद झाल्यानंतर टीम इंडियाने काही विकेट झटपट गमावल्या. देवदत्त पडिक्कलने 25 आणि वॉशिंग्टन सुंदरने 29 धावा केल्या. ऋषभ पंत आणि ध्रुव जुरेल काही खास करू शकले नाहीत.

विराटचा शतकी धमाका

पहिल्या डावात अपयशी ठरलेल्या विराटने दुसरा डाव मात्र चांगलाच गाजवला. खराब फॉर्मशी झगडणारा विराट बऱ्याच दिवसांनी आपल्या जुन्या स्टाईलमध्ये दिसला. त्याने कसोटी कारकिर्दीतील 30 वे शतक साजरे करताना 143 चेंडूत 8 चौकार व 2 षटकारासह नाबाद 100 धावा फटकावल्या. त्याला नितीश रे•ाrने चांगली साथ दिली. या दोघांनी सातव्या विकेटसाठी 77 धावांची भागीदारी केली. विराटचे शतक पूर्ण झाल्यानंतर बुमराहने टीम इंडियाचा दुसरा डाव 6 बाद 487 धावांवर घोषित केला. डाव घोषित होताना भारताने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 534 धावांचे लक्ष्य ठेवले.

बुमराह-सिराजचा कहर

या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवसअखेर 3 विकेट्स गमावल्या. दिवसअखेर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 4.2 षटकांत 3 बाद 12 अशी आहे. भारताकडून जसप्रीत बुमराहने 2 आणि मोहम्मद सिराजने 1 बळी घेतला. डावातील पहिल्याच षटकांत बुमराहने नॅथन मॅकस्विनीला तंबूचा रस्ता दाखवला. यानंतर कर्णधार पॅट कमिन्सला बाद करत सिराजने भारताला दुसरे यश मिळवून दिले. पुढील षटकात बुमराहने मार्नस लाबुशेनला शिकार बनवले.  उस्मान ख्वाजा 3 धावांवर नाबाद राहिला.

संक्षिप्त धावफलक

भारत पहिला डाव 150 व दुसरा डाव 134.3 षटकांत 6 बाद 487 घोषित (जैस्वाल 297 चेंडूत 161, केएल राहुल 77, पडिक्कल 25, विराट कोहली 143 चेंडूत नाबाद 100, नितीश रे•ाr नाबाद 38, वॉशिंग्टन सुंदर 29, नॅथन लियॉन 2 बळी, स्टार्क, हॅजलवूड, पॅट कमिन्स व मार्श प्रत्येकी एक बळी).

ऑस्ट्रेलिया पहिला डाव 104 व दुसरा डाव 4.2 षटकांत 3 बाद 12 (मॅकस्विनी 0, उस्मान ख्वाजा नाबाद 3, पॅट कमिन्स 2, लाबुशेन 3, बुमराह 2 व सिराज 1 बळी).

जैस्वालचा धमाका, एक शतक अनेक विक्रम...

ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटीत यशस्वी जैस्वालने कसोटी कारकिर्दीतील चौथे शतक झळकावले. ऑस्ट्रेलियन भूमीवर त्याचे हे पहिले शतक आहे. तर ऑस्ट्रेलियातील पहिल्या कसोटीत शतक झळकावणारा तो तिसरा भारतीय ठरला आहे. याशिवाय, केएल राहुलसोबत त्याने भारतीय सलामीवीर म्हणून सर्वात मोठ्या भागीदारीचा विक्रमही केला. या शतकी खेळीसह त्याने या विक्रमांना गवसणी घातली आहे. जैस्वालचे ऑस्ट्रेलियन भूमीवरील हे पहिले शतक ठरले. तब्बल 47 वर्षांनंतर भारतीय फलंदाजाने ऑस्ट्रेलियात असे खास शतक ठोकले आहे. याआधी भारतासाठी ऑस्ट्रेलियातील पहिल्याच कसोटी सामन्यात केवळ दोनच फलंदाजांनी शतक झळकावले होते. अशी कामगिरी करणारा जैस्वाल हा भारताचा तिसरा फलंदाज ठरला आहे. ही कामगिरी प्रथम एमएल जयसिंह यांनी 1967-68 मध्ये आणि नंतर सुनील गावसकर यांनी 1977-78 मध्ये केली होती. आता यशस्वीने या लिस्टमध्ये स्थान मिळवले आहे.

जैस्वाल-केएल राहुलची ऑस्ट्रेलियात सर्वोत्तम भागीदारी

ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीतील भारताच्या दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल यांनी 201 धावांची सलामीची भागीदारी करून संघाला मजबूत स्थितीत आणले. ऑस्ट्रेलियात भारतासाठी पहिल्या विकेटसाठीची ही सर्वोच्च भागीदारी आहे. याआधी कोणत्याही भारतीय सलामी जोडीने 200 धावांचा टप्पा ओलांडला नव्हता. राहुल-यशस्वीच्या जोडीने हा पराक्रम केला आहे. यापूर्वी 1986 मध्ये सुनील गावसकर आणि के श्रीकांत यांनी भारताच्या पहिल्या विकेटसाठी 191 धावांची भागीदारी केली होती. यानंतर आता तब्बल 38 वर्षांनंतर या दोन्ही फलंदाजांनी हा विक्रम मोडीत काढत नवा विक्रम आपल्या नावावर केला.

ऑस्ट्रेलियात भारतासाठी सर्वात मोठी सलामीची भागीदारी

201 - यशस्वी जैस्वाल-केएल राहुल पर्थमध्ये (2024)

191 - सुनील गावसकर-कृष्णमाचारी श्रीकांत सिडनीमध्ये (1986)

165 - चेतन चौहान-सुनील गावसकर मेलबर्नमध्ये (1981).

दीर्घ कालावधीनंतर संपली प्रतीक्षा, किंग कोहलीचा शतकी धमाका

पर्थमध्ये किंग कोहलीची जादू पहायला मिळाली. पहिल्या डावात अवघ्या पाच धावांवर बाद झालेल्या विराट कोहलीने पर्थ कसोटीच्या दुसऱ्या डावात जोरदार पुनरागमन करताना विराट कोहलीने नाबाद शतक साजरे केले. कोहलीने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 30 वे शतक 143 चेंडूत पूर्ण केले. अशा प्रकारे कोहलीने गेल्या 1 वर्ष 4 महिन्यांपासून सुरु असलेला शतकाचा दुष्काळ संपवला. त्याचे मागील शतक वेस्ट इंडिजविरुद्ध जुलै 2023 मध्ये पोर्ट ऑफ स्पेन येथे झाले होते. दरम्यान, विराटचे हे ऑस्ट्रेलियातील सातवे शतक आहे. या शतकासह त्याने ऑस्ट्रेलियात शतकांच्या बाबतीत 6 शतके झळकावणाऱ्या सचिन तेंडुलकरला मागे टाकले. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वाधिक शतकांबद्दल बोलायचे झाले, तर विराटच्या नावावर आता 81 शतके आहेत. या यादीत सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 100 शतके करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. या यादीत विराट 81 शतकांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article