For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बुमराह तंदुरु स्ती चाचणीत उत्तीर्ण

06:11 AM Aug 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
बुमराह तंदुरु स्ती चाचणीत उत्तीर्ण
Advertisement

श्रीलंकेतील मालिकेत खेळणार

Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला बेंगळूर येथील बीसीसीआयच्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ने पुढील महिन्यात श्रीलंकेविरु द्ध होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत खेळण्यासाठी परवानगी दिली आहे. इंग्लंडविरु द्धच्या नुकत्याच झालेल्या एकदिवसीय मालिकेत दुखापत झाल्यामुळे बुमराहची निवड तंदुऊस्तीच्या अटीवर करण्यात आली होती. या दुखापतीमुळे त्याला लॉर्ड्सवरील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातून बाहेर बसावे लागले होते.

जसप्रीत बुमराह दुखापतीतून सावरला आहे. त्याने ‘सीओई’ने अनिवार्य केलेल्या तंदुऊस्ती चाचण्या उत्तीर्ण केल्या आहेत. आशा आहे की, तो दोन्ही सामन्यांसाठी उपलब्ध असेल, कारण तो संघाच्या योजनांचा एक अविभाज्य भाग आहे, असे बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर बोलताना सांगितले.

Advertisement

श्रीलंकेविऊद्धची दोन कसोटी सामन्यांची मालिका 15 ऑगस्ट रोजी गालमध्ये सुरू होईल आणि दुसरा सामना 23 ऑगस्टपासून कोलंबोमध्ये खेळला जाईल. विद्यमान जागतिक कसोटी स्पर्धेतील अंतिम सामन्यातील स्थानासाठीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी भारताला आपल्या उर्वरित नऊ कसोटी सामन्यांपैकी सात सामने जिंकणे आवश्यक आहे.

न्यूझीलंडविऊद्धच्या परदेशातील मालिकेला सुऊवात करण्यापूर्वी श्रीलंकेविऊद्धची मालिका 2-0 च्या फरकाने जिंकणे खूप महत्त्वाचे आहे. ही एक कठीण लढत ठरण्याची शक्यता आहे. आधीच भारतीय संघातून हर्षित राणा आणि नितीश रे•ाr हे दुखापतीमुळे बाहेर पडले आहेत. वॉशिंग्टन सुंदर धोंडशिरेच्या दुखापतीमुळे पहिल्या कसोटीतून बाहेर झाला आहे आणि आकाश दीप पाठीच्या दुखापतीमुळे दीर्घकाळ मैदानाबाहेर आहे.

Advertisement
Tags :

.