For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लंकन कसोटी मालिकेतून बुमराह बाहेर

06:36 AM Aug 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
लंकन कसोटी मालिकेतून बुमराह बाहेर
Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

Advertisement

भारतीय क्रिकेट संघ या महिन्याच्या उत्तरार्धात लंकेच्या दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्यात उभय संघात आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळविली जाणार आहे. मात्र भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला दुखापतीमुळे या मालिकेला मुकावे लागणार आहे.

32 वर्षीय बुमराहच्या गुडघ्याला सूज आली असून ही सूज अद्याप पूर्णपणे कमी झालेली नाही. त्यामुळे बुमराहला मंडळाच्या वैद्यकीय पथकाने सहभागी न होण्याचा सल्ला दिला आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिली कसोटी 15 ऑगस्टपासून गॅलेमध्ये तर दुसरी कसोटी 23 ऑगस्टपासून कोलंबोत खेळविली जाणार आहे. या मालिकेसाठी जम्मू काश्मिरच्या वेगवान गोलंदाज अकिब नबी किंवा विदर्भच्या यश ठाकूर यापैकी एकाची बुमराहच्या जागी बदली खेळाडू म्हणून निवड केली जाईल. नितीशकुमार रे•ाr, हर्षित राणा आणि वॉशिंग्टन सुंदर यांना दुखापतीमुळे या मालिकेसाठी निवडण्यात आलेले नाही.

Advertisement

Advertisement
Tags :

.