महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

बुमराह, मानधना आयसीसीचे सर्वोत्तम क्रिकेटपटू

06:41 AM Jul 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/दुबई

Advertisement

आयसीसीच्या जून महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंचा बहुमान पुरूष विभागात भारताच्या जसप्रित बुमराहने तर महिलांच्या विभागात स्मृती मानधनाने पटकाविला.

Advertisement

आयसीसीतर्फे क्रिकेटपटूंच्या कामगिरीचा विविध स्पर्धातील आढावा घेऊन प्रत्येक महिन्यात सर्वोत्तम क्रिकेटपटूंची निवड पुरूष आणि महिल विभागात केली जाते. नुकत्याच झालेल्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील मालिकावीर तसेच वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराहची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. जून महिन्यातील सर्वोत्तम पुरूष क्रिकेटपटूच्या शर्यतीमध्ये भारताचे बुमराह, कर्णधार रोहित शर्मा आणि अफगाणचा गुरबाज यांचा सहभाग होता. पण बुमराहने आपल्या नजीकच्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत हा पुरस्कार पटकाविला. गेल्या महिन्यात झालेल्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बुमराहने 15 गडी बाद करुन मालिकावीराचा बहुमान मिळविला होता.

महिलांच्या विभागात भारतीय संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाने गेल्या महिन्यात द. आफ्रिका संघाबरोबर झालेल्या वनडे मालिकेत दर्जेदार फलंदाजी केली. पहिल्या सामन्यात 117 धावांची खेळी केली होती. त्यानंतर या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात तिने आणखी एक शतक झळकविले. तिने या दुसऱ्या सामन्यात 120 चेंडुत 136 धावा झोडपल्या होत्या. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात मानधनाने 90 धावांची खेळी केली. या मालिकेत तिने 343 धावा जमविल्या. या कामगिरीमुळे आयसीसीने तिची जून महिन्यातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू म्हणून निवड केली.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#sports
Next Article