For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

दसऱ्यापूर्वी वाहन बाजारात बंपर बुकिंग

07:00 AM Oct 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
दसऱ्यापूर्वी वाहन बाजारात बंपर बुकिंग
Advertisement

ऑक्टोबरमध्ये विक्रीचा विक्रम मोडला जाण्याची ऑटो डिलर्सना आशा : फाडाच्या सर्वेक्षणामधून माहिती

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

वाहन डीलर्सना नवरात्री आणि दसऱ्यापूर्वी चांगले बुकिंग मिळत आहे. त्यांना आशा आहे की श्राद्ध पक्षातील ही मागणी ऑक्टोबरच्या मध्यापासून वाहन विक्रीत रूपांतरित होऊ शकते. तथापि, यावर्षी ऑक्टोबरमध्ये वर्षानुवर्ष तुलना करणे कठीण होईल, कारण गेल्या वर्षी जीएसटी बदलापूर्वी खरेदी मंदावली होती आणि त्यानंतर विक्री वाढली. वाहन डीलर्सची संघटना ‘फाडा“च्या सर्वेक्षणानुसार, 75.57 टक्के डीलर्सना ऑक्टोबरमध्ये विक्री वाढण्याची अपेक्षा आहे. सप्टेंबरपूर्वी हा आकडा 67.09 टक्के होता. सुमारे 63 टक्के डीलर्सनी सांगितले की त्यांच्याकडे चांगल्या बुकिंग ऑर्डर आहेत. फाडाचे अध्यक्ष साई गिरीधर यांनी सांगितले, ‘बुकिंग प्रत्यक्षात अधिक आणि चांगले होत आहे.“

Advertisement

सप्टेंबरमध्ये वाहनांच्या किरकोळ विक्रीने विक्रमी पातळी गाठली. एकूण वाहन नोंदणी वार्षिक तुलनेत 31.82 टक्क्यांनी वाढून 25.4 लाख वाहनांवर पोहोचली. परंतु ऑगस्टच्या तुलनेत, त्यात 4.69 टक्क्यांनी वाढ झाली. प्रवासी वाहनांची विक्रमी किरकोळ विक्री 4,27,213 वाहनांवर पोहोचली. यात वार्षिक तुलनेत 32.1 टक्क्यांनी आणि ऑगस्टच्या तुलनेत 6.17 टक्क्यांनी वाढ झाली आहे. दुचाकींची विक्री 33.08 टक्क्यांनी वाढून 17.9 लाख वाहनांवर पोहोचली. फाडाने सांगितले की, गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत विक्रीतील वाढीला कमकुवत आधाराचा फायदा झाला आहे.

सप्टेंबर 2025 मध्ये, 22 सप्टेंबरपासून लागू होणाऱ्या नवीन जीएसटी दरांच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांनी खरेदी पुढे ढकलली. सप्टेंबर वगळता, 2027 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांत किरकोळ विक्री सुमारे 17 टक्क्यांनी वाढली. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत किरकोळ विक्रीने विक्रमी 1.55 कोटी वाहनांची नोंद केली. यात 20.77 टक्क्यांची वाढ झाली. इलेक्ट्रिक वाहनांच्या बाबतीत मागणी आणि पुरवठ्यात तफावत आहे. सप्टेंबरमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची किरकोळ विक्री सुमारे 3.34 लाख वाहनांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचली.

एकूण वाहनांमध्ये त्यांचा वाटा सुमारे 13 टक्क्यांपर्यंत वाढला. प्रवासी वाहनांमध्येही इलेक्ट्रिक वाहनांचा वाटा विक्रमी 8.45 टक्के होता. गिरिधर म्हणाले की, बॅटरी आणि मालवाहतूक यांसारख्या आयात केलेल्या मालाशी संबंधित समस्यांमुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या उपलब्धतेवर परिणाम होत आहे. काही वाहन कंपन्यांनी सांगितले आहे की मालवाहतुकीचा खर्च दोन ते तीन पटीने वाढेल. अशा परिस्थितीत, ज्या ग्राहकांना इलेक्ट्रिक वाहनाच्या डिलिव्हरीची वाट पाहायची नाही, ते पेट्रोल किंवा सीएनजी वाहन खरेदी करू शकतात.

Advertisement
Tags :

.