गुरुवारच्या सत्रात तेजी पुन्हा परतली
सेन्सेक्स 359 तर निफ्टी 105 अंकांच्या मजबुतीसोबत बंद
वृत्तसंस्था /मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील गुरुवारच्या सत्रात बुधवारी मोठ्या घसरणीमुळे निर्माण झालेली तेजीची पोकळी भरुन काढली आहे. दिवसभरातील कामगिरीत बाजारात चढ-उताराचा प्रवास राहिला होता. यात सेन्सेक्स 350 पेक्षा अधिक व निफ्टी 105 अंकांनी वधारुन बंद झाल्याचे दिसून आले. प्रारंभीच्या काळात मात्र शेअर बाजाराने 600अंकांच्या घसरणीची नेंद केली होती. दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स 358.79 अंकांनी वधारुन निर्देशांक 70,865.10 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 104.90 अंकांच्या मजबुतीसह निर्देशांक 21,255.00 वर बंद झाला आहे. बाजारात निफ्टीमधील 38 कंपन्यांचे समभाग हे वधारले आहेत तर 12 समभाग हे प्रभावीत होत बंद झाले आहेत. पॉवरग्रिडचे समभाग हे सर्वाधिक तेजीत रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी बँक यांचे समभाग राहिले आहेत. सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये पॉवरग्रिडचे समभाग 2.27 टक्क्यांनी वधारले आहेत. यासह एचडीएफसी बँक, कोटक बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, एनटीपीसी, स्टेट बँक, आयटीसी, विप्रो, टीसीएस यांचे समभाग हे प्रामुख्याने वधारले आहेत.
या काराणांमुळे बाजारात तेजी....
- बाजारात मोठी हिस्सेदारी असणाऱ्या कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी बँक समभागातील मजबूत स्थितीचा बाजाराला फायदा
- घसरणीनंतरही बाजाराने खरेदीच्या रणनीतीमुळे आपली तेजी टिकवली
डॉलरच्या तुलनेत रुपया प्रभावीत
जागतिक व्यापारातील चिंता आणि विदेशी फंड काढण्यात आल्याच्या कारणांमुळे अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया गुरुवारच्या सत्रात 9 पैशांनी घसरुन 83.27 वर बंद झाला आहे. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून बुधवारी 1,322.08 कोटी रुपयांच्या इक्विटीची विक्री करण्यात आली.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- बीपीसीएल 449
- पॉवरग्रीड कॉर्प 232
- ब्रिटानिया 5059
- एचडीएफसी बँक 1686
- हिंडाल्को 556
- एनटीपीसी 301
- कोटक महिंद्रा 1852
- रिलायन्स 2562
- अपोलो हॉस्पिटल 5475
- एलटीआय माईंटी 6111
- आयशर मोटर्स 3957
- एसबीआय 643
- ग्रेसीम 2085
- टाटा स्टील 131
- कोल इंडिया 355
- युपीएल 577
- हिरोमोटो कॉर्प 3850
- इंडसइंड बँक 1570
- टायटन 3580
- अल्ट्राटेक सिमेंट 9954
- अदानी पोर्टस 1018
- भारती एअरटेल 977
- अदानी एंटरप्रायजेस 2799
- टाटा मोटर्स 708
- विप्रो 434
- डिव्हीज लॅब्ज 3632
- टीसीएस 3787
- एशियन पेंट्स 3302
- लार्सन टुब्रो 3424
- टेक महिंद्रा 1250
- सनफार्मा 1233
- आयटीसी 451
- नेस्ले 25115
- एचडीएफसी लाईफ 644
समभाग घसरलेल्या कंपन्या
- बजाज ऑटो 6546
- बजाज फायनान्स 7367
- अॅक्सिस बँक 1095
- एचसीएल टेक 1422
- सिप्ला 2221
- बजाज फिनसर्व्ह 1666
- महिंद्रा अँड महिंद्रा 1633