For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शेअर बाजारात बुधवारी परतली तेजी

06:56 AM May 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
शेअर बाजारात बुधवारी परतली तेजी
Advertisement

सेन्सेक्स 117 अंकांनी तेजीत, रुपयाची घसरण सुरुच

Advertisement

बुधवारी सकाळच्या सत्रात भारतीय शेअर बाजारात घसरण दिसून आली होती. दिवसअखेर खरेदीला आलेला बहर शेअरबाजाराला तेजी मिळवून देण्यामध्ये यशस्वी झाला. मिडकॅप, स्मॉलकॅप निर्देशांक तेजीसोबत बंद झाले. तेल व गॅस, एनर्जी व डिफेन्स समभागांची खरेदी गुंतवणुकदारांनी केलेली दिसून आली.

त. भा. मुंबई

Advertisement

बुधवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 117 अंकांनी वाढत 75318 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 41 अंकांच्या वाढीसोबत 23659 अंकांवर बंद झाला. बँक निफ्टी निर्देशांक 153 अंकांनी वाढत 53562 अंकांवर बंद झाला. मंगळवारी तेजीत असणारा आयटी निर्देशांक मात्र 122 अंकांनी घसरत 29185 च्या स्तरावर बंद होताना दिसला.

समभागांची कामगिरी

बुधवारी शेअर बाजारात हिंडाल्को, रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज ऑटो, बजाज फिनसर्व, ग्रासिम आणि विप्रो यांचे समभाग सर्वाधिक तेजीत होते. दुसरीकडे बीईएल, टेक महिंद्रा, इटर्नल, टाटा स्टील, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि डॉ. रे•ाrज लॅब्ज यांचे समभाग सर्वाधिक घसरणीत होते. इतर समभागांची कामगिरी पाहता महिंद्रा आणि महिंद्रा, इंडिगो, एनटीपीसी, ट्रेंट, अपोलो हॉस्पिटल, मॅक्स हेल्थकेअर, ओएनजीसी, एसबीआय, टायटन, टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, कोल इंडिया, अल्ट्राटेक सिमेंट यांचे समभाग मजबूत दिसून आले. तर एशियन पेंटस्, सनफार्मा, टाटा कंझ्युमर, आयसीआयसीआय बँक, सिप्ला, आयशर मोटर्स, भारती एअरटेल, एचडीएफसी लाईफ, श्रीराम फायनान्स, अदानी एंटरप्रायझेस यांचे समभाग कमकुवत होत बंद झाले.

विविध क्षेत्राच्या कामगिरीकडे पाहता बँक आणि ऑटो निर्देशांकामध्ये दबाव पहायला मिळाला. निफ्टीतील ऑटो, कमोडिटीज, एनर्जी, फायनान्शीयल्स, इन्फ्रा, मेटल, ऑईल व गॅस आणि रियल्टी यांचे निर्देशांक तेजीसोबत बंद झाले. एनर्जीचा निर्देशांक 585 अंकांनी तेजीत होता. दुसरीकडे घसरणीमध्ये सीपीएसई, एफएमसीजी, आयटी आणि फार्मा या निर्देशांकाचा समावेश होता. सर्वाधिक घसरण एफएमसीजी निर्देशांकामध्ये 362 अंकांची दिसून आली.

जागतिक बाजारातले चित्र

जागतिक बाजारांकडे पाहता दक्षिण कोरियाचा कोस्पी 0.86 टक्के घसरणीत आणि जपानचा निक्केई 1.23 टक्के नुकसानीत होता. हॉगकाँगचा हॅगसेंगदेखील 0.57 टक्के कमकुवत होता. मंगळवारच्या सत्रामध्ये अमेरिकेतील बाजारांमध्ये दबाव पहायला मिळाला.

Advertisement
Tags :

.