For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मंगळवारी शेअर बाजारात पुन्हा परतली तेजी

06:55 AM Aug 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
मंगळवारी शेअर बाजारात पुन्हा परतली तेजी
Advertisement

सेन्सेक्स 286 अंकांनी तर निफ्टी 115 अंकांनी तेजीत, अमेरिका-इराण तणाव वाढला

Advertisement

सुरुवातीच्या सत्रामध्ये घसरणीत असणारा भारतीय शेअर बाजार शेवटच्या क्षणी मंगळवारी काहीशी तेजी राखत बंद होताना दिसला. सेन्सेक्स निर्देशांक 286 आणि निफ्टी 115 अंकांच्या वाढीसोबत बंद झाले होते. मेटल आणि ऑटो समभागांमध्ये दबाव पहायला मिळाला.

त. भा. वृत्तसंस्था

Advertisement

मुंबई : मंगळवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 286 अंकांनी वाढत 77656 च्या स्तरावर बंद होताना दिसला. दुसरीकडे 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 115 अंकांनी वाढत 24334 अंकांवर बंद झाला. सोमवारी शेअर बाजारामध्ये घसरण पहायला मिळाली होती.

मंगळवारच्या सत्रात इंडिगोचा समभाग सर्वाधिक दोन टक्के वाढीसोबत बंद झाला. या सोबत अदानी पोर्ट, इन्फोसिस, टायटन, ट्रेंट यांचे समभागसुद्धा चांगल्या तेजीसमवेत बंद होताना दिसले. 30 पैकी 24 समभागांनी मंगळवारी तेजी दर्शवली होती. तेजीमध्ये मॅक्स हेल्थकेअर, अपोलो हॉस्पिटल, भारत इलेक्ट्रॉनिक, बजाज ऑटो, रिलायन्स इंडस्ट्रीज, लार्सन टूब्रो, आयटीसी, श्रीराम फायनान्स, नेस्ले इंडिया, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा स्टील, महिंद्रा आणि महिंद्रा, ग्रासिम, मारुती सुझुकी,  एनटीपीसी यांचे समभागही तेजीसोबत बंद झाले.  दुसरीकडे इटर्नल, एचसीएल व पॉवरग्रीड यांचे समभाग घसरणीत होते. या व्यतिरिक्त एचडीएफसी बँक, एशियन पेंटस्, एसबीआय लाईफ, टाटा मोटर्स, कोल इंडिया, हिंडाल्को, ओएनजीसी, विप्रो, जेएसडब्ल्यू स्टील, अॅक्सिस बँक यांची कामगिरी निराशादायी राहिली.

विविध क्षेत्रांची कामगिरी पाहता मेटल आणि ऑटो यांचे निर्देशांक  सर्वाधिक कमकुवत दिसून आले. दुसरीकडे निफ्टीतील आयटी व पीएसयू बँक यांची कामगिरी मजबुत पहायला मिळाली. निफ्टी मिडकॅप निर्देशांक 0.02 टक्के वाढला तर निफ्टी स्मॉल कॅप निर्देशांक 0.06 टक्के घसरणीसोबत बंद झाला.

जागतिक बाजारातील चित्र

जागतिक बाजारांकडे पाहता दक्षिण कोरियाचा कोस्पी 0.68 टक्के वाढत 6743वर व्यवहार करत होता. जपानचा निक्केई 0.50 टक्के वाढत 65856 वर कार्यरत होता. हाँगकॉगचा हँगसेंग 0.02 टक्के वाढत 25511 वर व्यवहार करत होता. 24 ऑगस्ट रोजी अमेरिकेतील बाजारामध्ये घसरण होती. डो जोन्स अल्पशा तेजीत तर नॅसडॅक व एस अँड पी 500 घसरणीत राहिला होता.

Advertisement
Tags :

.