For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शेवटच्या दिवशी शेअरबाजारात परतली तेजी

06:09 AM Apr 18, 2026 IST | Tarun Bharat Portal
शेवटच्या दिवशी शेअरबाजारात परतली तेजी
Advertisement

सेन्सेक्स 504 अंकांनी तेजीत, स्मॉल कॅप-  मिडकॅप समभागांची खरेदी, रुपया 27 पैशांनी वधारला

Advertisement

त. भा. वृत्तसंस्था

मुंबई : शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअरबाजार तेजीसोबत बंद होताना दिसला. मेटल, एफएमसीजी आणि ऑईल अँड गॅस यांच्या निर्देशांकाने मजबूत कामगिरी केली. स्मॉलकॅप व मिडकॅप समभागांची खरेदी मोठ्या प्रमाणात पहायला मिळाली. डॉलरच्या तुलनेत रुपया 27 पैशांनी मजबूत होत बंद झालेला दिसून आला.

Advertisement

शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 504 अंकांनी वाढत 78493 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 156 अकांनी वाढत 24353 च्या स्तरावर बंद झाला. सेन्सेक्समधील 30 पैकी 25 समभाग तेजीत तर निफ्टीमधील 50 पैकी 39 समभाग मजबुतीसोबत बंद झाले. निफ्टी बँक निर्देशांकातील सर्व 14 बँकांचे समभाग तेजी दाखवत बंद झाले. निफ्टी बँक निर्देशांक 479 अंकांनी वाढत 56565 अंकांवर बंद झाला.  मिडकॅप निर्देशांक 751 अंकांनी वाढत 59898 अंकांवर बंद झाला.

समभागांची कामगिरी

हिंदुस्थान युनिलिव्हर, नेस्ले इंडिया, अपोलो हॉस्पिटल, भारत इलेक्ट्रॉनिक्स, अदानी पोर्ट, टाटा मोटर्स पीव्ही, एनटीपीसी, टीसीएस, अल्ट्राटेक सिमेंट, अॅक्सिस बँक, एशियन पेंट, टाटा कंझ्युमर, टाटा स्टील, ओएनजीसी, मारुती सुझुकी, टायटन, कोल इंडिया, आयटीसी, सिप्ला, इंटरग्लोब एव्हिएशन, भारती एअरटेल, ट्रेंट, बजाज फायनान्स, जिओ फायनान्शीयल व श्रीराम फायनान्स यांचे समभाग तेजीत होते. दुसरीकडे इटर्नल, इन्फोसिस, हिंडाल्को, सनफार्मा, महिंद्रा आणि महिंद्रा, लार्सन टूब्रो, एचसीएल टेक्नॉलॉजीज, बजाज ऑटो, एसबीआय लाईफ, विप्रो व एचडीएफसी लाईफ यांचे समभाग घसरणीसोबत बंद झाले.

जागतिक बाजारातले चित्र

आशियाई बाजारामध्ये शुक्रवारी सकाळी घसरण दिसून आली. वॉल स्ट्रिटचा निर्देशांक दमदार तेजीत होता. जपानचा निक्केई आणि दक्षिण कोरियाचा कोस्पी अनुक्रमे 0.83 टक्के, 0.33 टक्के घसरणीत होते. गुरुवारी एस अँड पी 500 निर्देशांक आणि नॅसडॅक कंपोझिट यांनी विक्रमी तेजी अनुभवली होती. सदरचे दोन्ही निर्देशांक अनुक्रमे 0.26 टक्के, 0.36 टक्के वाढत बंद झाले. डो जोन्स इंडस्ट्रीयल एव्हरेज निर्देशांक 0.24 टक्के वाढत बंद झाला.

Advertisement
Tags :

.