भारतीय शेअर बाजारात तेजीचा कल कायम
सेन्सेक्स, निफ्टीची नव्या विक्रमाला गवसणी : युपीएलचे समभाग चमकले
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय शेअर बाजारात सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी तेजीचा कल राहिला होता. दिवसभरात युपीएल, अल्ट्राटेक यांचे समभाग तेजीसमवेत बंद झाले. याचदरम्यान दिवसभराच्या सत्रात सेन्सेक्सने 70 हजाराची पातळी आणि निफ्टीने 21 हजाराची पातळी गाठण्यात यश मिळवले होते.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 102 अंकांच्या वाढीसह 69,928 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 27 अंकांनी वाढत 20,997 अंकांवर बंद झाला होता. युपीएल, अल्ट्राटेक सिमेंट, ओएनजीसी यांचे समभाग तेजीत राहिले होते तर डॉ. रे•िज लॅब्जचे समभाग मात्र सर्वाधिक 5 टक्के घसरले होते. एफएमसीजी निर्देशांक 0.6 टक्के इतका वाढला होता तर आयटी आणि ऑटो निर्देशांक 0.50 टक्के तेजीसह कार्यरत होता. निफ्टी मिडकॅप निर्देशांक 0.74 टक्के तेजीत होता. बँकिंग समभाग मात्र काहीसे तेजीत होते. सोमवारी फार्मा क्षेत्रातील समभागांमध्ये दबावाचे वातावरण पाहायला मिळाले. एनएसईवर युपीएलचे समभाग सर्वाधिक 3 टक्के वाढीसह आघाडीवर हेते. अल्ट्राटेक सिमेंटचे समभाग 2.50 टक्के, ओएनजीसी 1.70 टक्के व अदानी एंटरप्रायझेसचे समभाग 1.20 टक्के तेजीसमवेत कार्यरत होते. औषध क्षेत्रातील कंपन्यांमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळाला. डॉ. रे•िज लॅब्जचे समभाग सर्वाधिक 5 टक्के कोसळले होते. यासोबत सिप्ला यांचे समभागही 1.46 टक्के इतके घसरलेले दिसले. अॅक्सिस बँक व बीपीसीएल यांचे समभागही 1 टक्के घसरणीत राहिले होते.
सेन्सेक्सची 70 हजाराला गवसणी
याचदरम्यान सकाळच्या सत्रात बाजारात तेजी एकदम वाढलेली दिसली. यातच सेन्सेक्सने 70,057 अंकांची सर्वोच्च पातळी गाठली. पण शेवटी मात्र 70 हजारच्या खाली सेन्सेक्स बंद झाला होता. सेन्सेक्सने 60 हजार ते 70 हजाराची पातळी गाठण्यासाठी 548 दिवसांचा कालावधी घेतला आहे. तर सोमवारी निफ्टीनेही 21 हजाराची पातळी गाठत 21026 पर्यंत झेप घेतली होती.
जागातिक बाजारात अमेरिका, युरोपियन बाजारात मिश्र कल होता. अमेरिकेत डोव्ह जोन्स 33 अंकांनी घसरणीत तर नॅसडॅक 65 अंकांनी तेजीत होता. आशियाई बाजारात निक्की 483 अंकांनी, शांघाई कम्पोझीट 21 अंक, कोस्पी 7 अंक, सेट कम्पोझीट 2 अंकांनी वाढत व्यवहार करत होता. तर हँगसेंग 132 अंकांनी घसरणीत होता.