For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मंगळवारच्या सत्रात बाजारात परतला तेजीचा सूर

06:23 AM Jun 10, 2026 IST | Tarun Bharat Portal
मंगळवारच्या सत्रात बाजारात परतला तेजीचा सूर
Advertisement

सेन्सेक्स निर्देशांक 394 अंकांनी वधारला, ऑटो, बँकांच्या कामगिरीचा बाजाराला लाभ, कच्चे तेल घसरले

Advertisement

भारतीय शेअरबाजारात मंगळवारी तेजीचा सूर दिसून आला. सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका, वित्त संबंधीत कंपन्यांचे समभाग व ऑटो क्षेत्रातल्या समभागांच्या दमदार कामगिरीने बाजाराला आधार दिला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे शांती वार्ता सुरुच राहणार असल्याचे वक्तव्य व इराण-इस्रायल यांच्या हल्ल्यातील विरामाच्या बातमीचा परिणाम बाजारावर दिसला.

वृत्तसंस्था, मुंबई

Advertisement

मंगळवारी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 394 अंकांच्या वधारासह 73918 अंकांवर बंद होताना दिसला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 119 अंकांनी वाढत 23242 अंकांवर बंद झाला होता. सेन्सेक्समधील 30 पैकी 20 समभाग हे तेजी दाखवत बंद झाले होते. निफ्टी निर्देशांकातील 50 पैकी 29 समभाग हे मजबूत होत बंद झाले. निफ्टी बँक निर्देशांकातील 14 पैकी 13 बँका या मजबूत कामगिरी करत बंद झाल्या होत्या. बँक निफ्टी निर्देशांक 1130 अंकांच्या दमदार वधारासह 55194 च्या स्तरावर बंद झाला होता. आयटी निर्देशांक मात्र मंगळवारी कमकुवत होता. हा निर्देशांक सरतेशेवटी 137 अंकांनी पडत 28516 अंकांवर स्थिरावला होता.

हे समभाग तेजीत

मंगळवारी समभागांच्या कामगिरीचा विचार करता तेजीतले समभाग अधिक पाहायला मिळाले आहेत. तेजी राखण्यात इंडिगो, जियो फायनान्स, आयशर मोटर्स, एसबीआय, आयसीआयसीआय बँक, मारुती सुझुकी, एचयुएल, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा स्टील, नेस्ले, लार्सन टुब्रो, रिलायन्स इंडस्ट्रिज, कोल इंडिया, आयटीसी, जेएसडब्ल्यू स्टील, ट्रेंट, श्ा़dरीराम फायनान्स, अपोलो हॉस्पिटल, अॅक्सिस बँक, हिंडाल्को, महिंद्रा आणि महिंद्रा, अदानी एंटरप्रायझेस या समभागांचा महत्त्वाचा वाटा होता. याखेरीज पीआय इंडस्ट्रिजचा समभाग तर एका दिवसात 185 रुपये प्रति समभाग याप्रमाणे वाढत 2866 रुपयांवर पोहचला. एमआरपीएल, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय बँक यांनीही मजबूत होत बाजाराला आधार दिला. तर दुसरीकडे टीसीएस, टाटा कंझ्युमर, एचसीएल टेक, विप्रो, बीईएल, टाटा मोटर्स पीव्ही, सनफार्मा, बजाज ऑटो, इटर्नल, सिप्ला, पॉवरग्रिड कॉर्प, एनटीपीसी, टायटन, भारती एअरटेल, ओएनजीसी, डॉ. रे•िज लॅब्ज यांनी बाजाराला खाली खेचण्याचा प्रयत्न केला.

विविध क्षेत्रांची कामगिरी

शेअरबाजारात विविध क्षेत्रांच्या निर्देशांकांचा मंगळवारी चांगला मूड दिसून आला. विविध निर्देशांकांमध्ये सीपीएसई व आयटी यांनी नकारात्मक कामगिरी केली होती. तर ऑटो, फायनॅन्शीयल्स, इन्फ्रा, एनर्जी, एफएमसीजी, फार्मा, मेटल, ऑईल व गॅस, रियल्टी यांचे निर्देशांक वधारत बंद झाले.

Advertisement
Tags :

.