बँकिंग समभागांच्या सहाय्याने शेअर बाजारात तेजीचा माहोल
सेन्सेक्स 373 अंकांनी मजबूत होत बंद: कच्चे तेल नरमले
वृत्तसंस्था/मुंबई
इराणमधील सामुद्रधुनी होर्मुजबाबत कराराच्या बातमीने शेअर बाजारात गुरुवारी उत्साह पसरलेला दिसून आला. सेन्सेक्स 373 अंकांनी वधारत बंद झाला. पीएसयु बँक व केमिकल समभागांच्या शानदार कामगिरीचा लाभ भारतीय शेअर बाजाराला झाला. गुरुवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 373 अंकांनी वाढत 78954 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 11 अंकांनी वाढत 24636 अंकांवर बंद झाला. कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरणीचा फायदाही बाजाराने उठवला आहे. निफ्टी मिडकॅप-100 निर्देशांक अर्धा टक्का घसरणीत होता तर निफ्टी स्मॉलकॅप-100 निर्देशांक अर्धा टक्का वाढत बंद झाला.
क्षेत्राच्या निर्देशांकात आयटी, ऑटो दबावात
विविध क्षेत्राच्या निर्देशांकाची कामगिरी पाहिल्यास आयटी, ऑटो व मेटल क्षेत्रांनी कमकुवत कामगिरी करत बाजारावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ऑटो निर्देशांक 1 टक्कापेक्षा अधिक कमकुवत झाला तर मेटल व आयटी देखील 1 टक्का इतका घसरलेला होता. पण दुसरीकडे सरकारी बँकांनी बाजाराला मजबुतीसोबत भक्कम आधार देण्याचा प्रयत्न केला. निफ्टी पीएसयु बँक निर्देशांक 2 टक्केपेक्षा अधिक तेजीत होता. गुरुवारी सुचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य 57 हजार कोटींनी कमी झाले होते.
हे समभाग तेजीत
विविध समभागांच्या कामगिरीवर नजर टाकल्यास श्रीराम फायनान्स, ग्रासिम इंडस्ट्रिज, जेएसडब्ल्यू स्टील हे सर्वाधिक तेजीत राहिले होते. याव्यतिरीक्त निफ्टीत रिलायन्स, जियो फायनॅन्शीयल, लार्सन टुब्रो, सिप्ला, एसबीआय, हिंदुस्थान युनिलिव्हर, नेस्ले इंडिया, इटर्नल, टायटन, आयसीआयसीआय बँक, सनफार्मा व अॅक्सिस बँक यांचे समभाग तेजीसह बंद झाले.
हे समभाग घसरणीत
दुसरीकडे एचसीएल टेक, टीसीएस हे आयटी क्षेत्राचे दोन समभाग व अपोलो हॉस्पिटलचा समभाग सर्वाधिक घसरणीत होते. यांच्यासोबत अदानी पोर्टस, टाटा कंझ्युमर, एनटीपीसी, बजाज ऑटो, भारती एअरटेल, डॉ. रेड्डिज लॅब्ज, कोटक मह्रां बँक, आशयर मोटर्स, कोल इंडिया, ट्रेंट, टाटा स्टील, टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, अल्ट्राटेक सिमेंट, एशियन पेंटस्, हिंडाल्को, इंडिगो, एचडीएफसी लाइफ यांचे समभागदेखील नुकसानीसह बंद झाले. आशियाई बाजारात घसरण होती. दक्षिण कोरीयाचा कोस्पी 4.58 टक्के, जपानचा निक्केई 0.93 टक्के आणि हाँगकाँगचा हँगसेंग 1.49 टक्के इतका घसरणीसोबत व्यवहार करत होता.

- रिलायन्स 1325
- एसबीआय 1085
- बीईएल 399
- इटर्नल 316
- टायटन 4998
- श्रीराम फायनान्स 1141
- सिप्ला 1477
- नेस्ले इंडिया 1535
- अपोलो हॉस्पिटल 8974
- सनफार्मा 1951
- आयसीआयसीआय 1457
- जियो फाय. 263
- अॅक्सिस बँक 1256
- लार्सन टुब्रो 4061
- कोल इंडिया 415
- टाटा टेक्नॉलॉजी 804
- माझगाव डॉक 2530
- हिंद एरोनॉटीक्स 4920
- पाइन लॅब्ज 156
- कल्याण ज्वेलर्स 598
- भारत डायनॅमिक्स 1299
पॉवरग्रिड कॉर्प 270- टाटा स्टील 189
- जेएसडब्ल्यू स्टील 1307
- टीसीएस 2373
- बजाज ऑटो 11620
- भारती एअरटेल 1948
- इंडिगो 5318
- कोटक बँक 394
- महिंद्रा आणि महिंद्रा 3406
- एनटीपीसी 345
- टाटा मोटर्स पीव्ही 345
- हिंडाल्को 1027
- बजाज फायनान्स 1144
- एचसीएल टेक 1335
- टेक महिंद्रा 1632
- ओएनजीसी 237
- एसबीआय लाइफ 1861
- अल्ट्राटेक सिमेंट 12075
- अदानी एंटरप्रायझेस 3026
- मारुती सुझुकी 14080