महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तेजी परतली, सेन्सेक्स 526 अंकांनी मजबूत

06:51 AM Mar 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

रिलायन्स, मारुती सुझुकीचे समभाग वधारले

Advertisement

मुंबई :

Advertisement

भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील दुसऱ्या सत्रात बुधवारी बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक एक दिवसांच्या घसरणीनंतर पुन्हा सावरल्याचे दिसून आले. यामध्ये प्रामुख्याने रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक आणि मारुती सुझुकी यांचे समभाग हे तेजीसह बंद झाले आहेत. बुधवारच्या सत्रात जागतिक बाजारातील मिळताजुळता कल राहिल्याचा फायदा हा भारतीय बाजाराला झाला आहे.

बुधवारच्या सत्रात बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 526.01 अंकांनी वधारुन निर्देशांक 0.73 टक्क्यांसोबत 72,996.31 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 118.95 अंकांच्या तेजीसह निर्देशांक 22,123.65 वर बंद झाला आहे.

प्रमुख कंपन्यांमध्ये सेन्सेक्समध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग हे सर्वाधिक म्हणजे 3.50 टक्क्यांनी वधारुन बंद झाले आहेत. या तेजीमध्ये सर्वाधिक योगदान हे रिलायन्सचे राहिले आहे. यासोबतच मारुती सुझुकी, बजाज फायनान्स, टायटन, कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी बँक, इंडसइंड बँक, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा आणि लार्सन अॅण्ड टुब्रो यांचे समभाग हे तेजीत राहिले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये विप्रो, एचसीएल टेक, नेस्ले, टाटा कंसल्टन्सी सर्व्हिसेस आणि टाटा मोर्ट्स यांचे समभाग मात्र नुकसानीसह बंद झाले आहेत.

जागतिक संकेत

जागतिक घडामोडींमध्ये आशियातील अन्य बाजारात जपानचा निक्की हा लाभात राहिला होता. तर दक्षिण कोरियाचा कॉस्पी, चीनचा शांघाय कम्पोझिट आणि हाँगकाँगचा हँगसेंग हे नुकसानीत राहिले आहेत. दरम्यान युरोपमधील मुख्य बाजारात सुरुवातीला मिळताजुळता कल राहिला होता.

शेअर बाजारातील आकडेवारीनुसार विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी मंगळवारी जवळपास 10.13 कोटी रुपये किमतींचे समभाग खरेदी केले आहेत. जागतिक तेल मानक ब्रेंट क्रूड 0.93 टक्क्यांनी घसरुन 85.42 अमेरिकन डॉलर प्रति बॅरेलवर राहिले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat#social media
Next Article