बुधवारीही शेअरबाजारात तेजीचा माहोल कायम
सेन्सेक्स 1205 अंकांनी तेजीत : ऑटो, बँकेचे समभाग चमकले
वृत्तसंस्था/ मुंबई
मध्य आशियात तणावाचे वातावरण निवळण्याचे संकेत तसेच जागतिक बाजारांमधील तेजीचा फायदा भारतीय शेअर बाजाराने पुन्हा बुधवारी उठवला होता. सेन्सेक्स निर्देशांक 1205 अंकांनी आणि निफ्टी 394 अंकांनी वाढत बंद झाला आहे. ऑटो, बँकिंग समभागांनी शेअरबाजाराला तेजी राखण्यासाठी मदत केल्याचे दिसून आले.
बुधवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 1205 अंकांनी वाढत 75273 अंकांवर बंद झाला होता तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टीही 394 अंकांनी वाढत 23306 अंकांवर बंद झाला होता. बँक निफ्टी निर्देशांक 1102 अंकांनी तेजीसह 53708 अंकांवर बंद झाला. विविध निर्देशांकांची कामगिरी पाहिल्यास सर्वच क्षेत्रे मजबुतीसोबत बंद झाले होते. ऑटो, कमोडिटीज, सीपीएसई, एनर्जी, फायनॅन्शीयल्स, एफएमसीजी, इन्फ्रा, आयटी, मेटल, ऑईल अँड गॅस, फार्मा व रियल्टी यांचे निर्देशांक तेजी राखत बंद झाले. यातही सर्वाधिक तेजीत राहिला तो फायनॅन्शीयल्सचा निर्देशांक, जो 574 अंकांच्या वाढीसोबत 25056 अंकांवर बंद झाला. यासोबत ऑटो निर्देशांकही 543 अंकांनी वाढत 25058 च्या स्तरावर बंद झाला होता.
हे समभाग तेजीत
बाजारात श्रीराम फायनान्स, अल्ट्राटेक सिमेंट, टायटन, ग्रासिम, बजाज फायनान्स, लार्सन टुब्रो, डॉ. रे•िज लॅब्ज, अदानी एंटरप्रायझेस, टेंट, एशियन पेंटस्, इंडिगो, अॅक्सिस बँक, मारुती सुझुकी, आयशर मोटर्स, एसबीआय लाइफ, आयटीसी, एनटीपीसी, रिलायन्स, ओएनजीसी, इन्फोसिस, विप्रो, हिंडाल्को, कोटक बँक, एचडीएफसी लाइफ, सिप्ला, हिंदुस्थान युनिलिव्हर, टाटा स्टील, महिंद्रा आणि महिंद्रा, सनफार्मा, भारती एअरटेल यांचे समभाग नफ्यासह बंद झाले.
हे समभाग घसरणीत
याचदरम्यात बाजारात बीईएल, टीसीएस, पॉवरग्रिड कॉर्प, टेक महिंद्रा, ऑईल इंडिया, आयजीएल, फॅक्ट, इंडस टॉवर्स, ओरॅकल फायनॅन्शीयल यांनी नकारात्मक कामगिरी केलेली दिसून आली.