For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मंगळवारीही शेअरबाजारात तेजीचा माहोल कायम

06:58 AM Apr 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
मंगळवारीही शेअरबाजारात तेजीचा माहोल कायम
Advertisement

वृत्तसंस्था, मुंबई

Advertisement

शेअरबाजारात सलग चौथे सत्र हे चांगल्या तेजीसोबत बंद झालेले दिसून आले. निफ्टीच्या विकली एक्सपायरीदिवशी सेन्सेक्स 509 अंकांनी तर निफ्टी 155 अंकांनी वाढत बंद होताना दिसला. मंगळवारी आयटी निर्देशांकाने 766 अंकांची तेजी अनुभवली होती.

मंगळवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 509 अंकांच्या वाढीसोबत 74616 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 155 अंकांनी वाढत 23123 च्या स्तरावर बंद झाला. सेन्सेक्समध्ये पाहता 30 पैकी 19 समभाग मजबुतीसोबत बंद होताना दिसले तर दुसरीकडे निफ्टीतील 50 पैकी 37 समभाग हे तेजीसह बंद होताना दिसले. याचदरम्यान निफ्टी बँक निर्देशांक 107 अंकांनी नाममात्र वाढत 52716 अंकांवर बंद झाला. बँकेच्या 14 समभागांमध्ये 7 बँकांचे समभाग मजबूत होत बंद झाले. निफ्टी मिडकॅप50 निर्देशांक 66 अंकांच्या तेजीसह 15573 अंकांवर बंद झाला.

Advertisement

विविध क्षेत्राच्या निर्देशांकांचा विचार करता सर्वच क्षेत्रे मंगळवारी तेजीत होती. ऑटो, कमोडिटीज, सीपीएसई, एनर्जी, फायनॅन्शीयल्स, एफएमसीजी, इन्फ्रा, मेटल, आयटी, ऑईल व गॅस, फार्मा व रियल्टी यांचे निर्देशांक तेजीत होते. यातही आयटी निर्देशांकाने सर्वाधिक 766 अंकांच्या तेजीसह 31403 च्या स्तरावर बंद होण्यात यश मिळवलं होतं. या पाठोपाठ एफएमसीजी निर्देशांक 380 अंकांनी वाढत बंद झाला होता.

समभागांची कामगिरी

समभागांच्या कामगिरीकडे पाहता विप्रो, हिंडाल्को, एचसीएल टेक, इन्फोसिस, भारती एअरटेल, ओएनजीसी, टेक महिंद्रा, जेएसडब्ल्यू स्टील, आयटीसी, टाटा कंझ्युमर, नेस्ले, टाटा मोटर्स पीव्ही, कोल इंडिया, मारुती सुझुकी, बीईएल, एचडीएफसी बँक, आयशर मोटर्स, सिप्ला, एशियन पेंटस्, ग्रासिम, पॉवरग्रिड कॉर्प, जियो फायनॅन्शीयल्स, बजाज फायनान्स, टाटा स्टील, सनफार्मा, बजाज ऑटो, आयसीआयसीआय बँक, श्रीराम फायनान्स, एम्फासिस, प्रेस्टीज इस्टेट, ओबेराय रियल्टी, फोनिक्स मिल्स, पॉलीकॅब यांचे समभाग तेजीसह बंद झाले. तर दुसरीकडे घसरणीत पाहता रिलायन्स, लार्सन टुब्रो, इटर्नल, एसबीआय, अल्ट्राटेक सिमेंट, ट्रेंट, टायटन, अदानी एंटरप्रायझेस, महिंद्रा आणि महिंद्रा, इंडिगो, डॉ. रे•िज लॅब्ज, ज्युबिलंट फुडस्, बायोकॉन, बँक ऑफ इंडिया, वोल्टास, बंधन बँक, ए बी फॅशन अँड रिटेल यांचा समावेश होता.

Advertisement
Tags :

.