महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारतीय बाजारातील तेजीला ब्रेक

06:21 AM Feb 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सेन्सेक्स 434 तर निफ्टी 141 अंकांनी प्रभावीत

Advertisement

मुंबई :

Advertisement

भारतीय भांडवली बाजारात मागील सहा सत्रांच्या प्रवासात सुरु असलेल्या तेजीला अखेर चालू सप्ताहातील तिसऱ्या सत्रात ब्रेक मिळाला आहे. यामध्ये अमेरिकन व्याजदरात कपातीचा निर्णय टळण्याची शक्यता आहे. तसेच आयटी क्षेत्रातील समभाग आणि एनर्जीचे समभाग यांच्यामध्ये सुरु असलेल्या घसरणीचा परिणाम म्हणून बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक प्रभावीत होत बंद झाले आहेत.

दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बुधवारी बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 434.31 अंकांनी घसरुन निर्देशांक 0.59 टक्क्यांसोबत 72,623.09 वर बंद झाले आहेत. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 141.90 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 22,055.05 वर बंद झाला आहे.

प्रमुख कंपन्यांच्या मदतीने सेन्सेक्समध्घल कंपन्यांमध्ये टाटा स्टील 1.99 टक्क्यांनी वधारले आहेत. यासोबतच देशातील मोठी सार्वजनिक बँक स्टेट बँक, पोलाद उत्पादक कंपनी जेएसडब्ल्यू स्टील, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा आणि आयसीआयसीआय बँकेसह अन्य 10 कंपन्यांचे समभाग वधारुन बंद झाले आहेत.

अन्य कंपन्यांमध्ये एनटीपीसीचे समभाग हे 2.76 टक्क्यांनी घसरणीत राहिले आहेत. यासह पॉवरग्रिड कॉर्प, विप्रो, एचसीएल टेक, लार्सन अॅण्ड टुब्रो, टेक महिंद्रा, इन्फोसिस, टीसीएस आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांच्यासह अन्य 20 कंपन्यांचे समभाग हे घसरणीसह बंद झाले आहेत.

जागतिक पातळीवरील घडामोडींमध्ये अमेरिकन केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरामधील कपातीची शक्यता कमी असल्यामुळे आयटी क्षेत्रात घसरणीचा कल राहिला होता. तसेच अन्य कंपन्यांच्या नफावसुलीचा परिणाम हा भारतीय बाजारात  झाल्याचे दिसून आले.

सोनी समूह कॉर्पचा भारतातील युनिटसोबतचा होणारा व्यवहार रद्द झाल्याने झी एंटरटेनमेंटचे समभाग हे घसरणीत राहिले आहेत. वर्षाच्या आधारे जवळपास 30 टक्क्यांची घसरण नोंदवली आहे. गेल्या सहा महिन्यात समभाग 36 टक्के घसरणीत राहिले आहेत.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article