महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बुलेट ट्रेनमध्ये असणार 3 श्रेणी

07:00 AM Mar 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था /अहमदाबाद

Advertisement

गुजरातच्या अहमदाबाद ते मुंबईदरम्यान धावणाऱ्या देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमध्ये एकाचवेळी 690 जण प्रवास करू शकणार आहेत. नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडनुसार रेल्वेत एकूण 10  कोच असतील. एका बुलेट ट्रेनची क्षमता 690 प्रवाशांना सामावून घेण्याची असेल. बुलेट ट्रेननमध्ये तीनप्रकारच्या आसनव्यवस्था असणार आहेत. सर्वात महागडे तिकीट फर्स्ट क्लासचे असून यात एकूण 15 सीट्स असतील. यानंतर बिझनेस क्लास असून याची क्षमता 55 प्रवाशांची असणार आहे. स्टँडर्ड क्लासमध्ये 620 सीट्स असणार आहेत. बुलेट ट्रेनमध्ये बहुउद्देशीय रुम्स असतील. याचबरोबर बुलेट ट्रेन पूर्णपणे दिव्यांगस्नेही असेल. गुजरातमध्ये बुलेट ट्रेनचे परीक्षण लवकरच प्रस्तावित आहे. हे परीक्षण सूरत ते बिलिमोरादरम्यान होण्याची अपेक्षा आहे. बुलेट ट्रेनच्या सुरक्षेसाठी पूर्ण मार्गात 28 भूकंप मापन यंत्रं बसविण्यात आली आहेत. बुलेट ट्रेन प्रकल्प गुजरातच्या 8 जिल्ह्यांमध्ये आहे. तर महाराष्ट्रात याचे तीन जिल्हे सामील आहेत. काही हिस्सा केंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगर हवेली आणि दमन तसेच दीवमध्ये आहे.

Advertisement

12 स्थानकांवर थांबणार बुलेट ट्रेन

बुले ट्रेन 12 स्थानकांवर थांबणार आहे. यात मुंबई-बीकेसी, ठाणे, विरार, भोईसर, वापी, बिलिमोरा, सूरत, भरूच, वडोदरा, आणंद, अहमदाबाद आणि साबरमती स्थानकांचा समावेश आहे. बुलेट ट्रेनचा मार्ग  400 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने डिझाइन करण्यात येणार आहे. यावररून 320-350 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने रेल्वे धावणार आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पाची निर्मिती शिंकानसेन टेक्नॉलॉजीकडून केली जात आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article