Karad | कराडमध्ये सलग चौथ्या दिवशी 'बुलडोझर' गर्रजला! बसस्थानक आणि दत्त चौक परिसरातील अतिक्रमणे जमीनदोस्त
कराडच्या प्रमुख चौकांतील अतिक्रमणांवर पालिकेचा हातोडा
कराड: कराड नगरपरिषदेच्याबतीने सोमबार पासून सुरू केलेली अतिक्रमण हटाव मोहीम गुरुवारी चौथ्या दिवशीही सुरुच होती. गुरुवारी पुन्हा बसस्थानक व दत्त चौक परिसरातील हातगाडे ताब्यात घेण्यात आले. तर दत्त चौकातून मुख्य बाजारपेठेतील वाहतूकीला अडथळा ठरणारे फलक काढण्यातआले.
तीन दिवसांत कृष्णा नाका, कॉटेज हॉस्पिटल परीसर, विजय दिवस चौक, बसस्थानक परिसर, दत्त चौक, शाहू चौक, कोल्हापूर नाका, पोपटभाई पेट्रोल पंप चौक, भेदा चौक परिसरातील जवळपास ९० अतिक्रमणे काढली आहेत. त्यामुळे या परिसरातील रस्ते व फुटपाथनी मोकळा श्वास घेतल्याचे पहावयास मिळत आहे.
गुरुवारी पुन्हा बसस्थानक व दत्त चौक परिसरात लागलेले हातगाडे काढण्यात आले. तसेच दत्त चौक ते चावडी चौक ते कृष्णा नाका दरम्यान मुख्य बाजारपेठेतील वाहतुकीस अडथळा ठरणारे फलक जप्त करण्यात आले. सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाल्याने अतिक्रण हटाव मोहीम थांबवण्यात आली.