मॉडिफाय सायलेन्सरवर बुलडोजर
कोल्हापूर :
कोल्हापूर आणि इचलकरंजी शहर वाहतुक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी गत वर्षी 737 कर्णकर्कश आवाजाच्या मॉडिफाय बुलेटच्या सायलेन्सर जप्त केले होते. त्या सायलेन्सरवर शुक्रवारी सकाळी शहरातील दसरा चौकात कोल्हापूर शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्या उपस्थितीत बुलडोजर फिरवून, मॉडिफाय सायलेन्सर कायमस्वऊपी निकामी करण्यात आले.
कोल्हापूर आणि इचलकरंजी शहर वाहतुक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी गत वर्षी जप्त केलेल्या कर्णकर्कश आवाजाच्या मॉडिफाय बुलेटच्या सायलेन्सरवर शुक्रवारी सकाळी बुलडोजर फिरवला. कोल्हापूर वाहतुक पोलिसांच्याकडून 1235 मॉडिफाय दुचाकीवर कारवाई करुन, 12 लाख 33 हजार ऊपयाचा दंड आकारण्यात आला. तर इचलकरंजी वाहतुक शाखेकडून 36 मॉडिफाय बुलेटच्या सायलेन्सरवर कारवाईचा बडगा उगारला होता. 737 मॉडिफाय सायलेन्सर काढून घेण्यात आले होते. त्या सायलेन्सरवर शहरातील दसरा चौकात कोल्हापूर शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्या उपस्थितीत बुलडोजर फिरवून कायमस्वरुपी निकामी करण्यात आले.
जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी बुलेटचे यांत्रिक भाग व तांत्रिक रचनेत बदल कऊन, फटाक्यांसारखा आवाज काढीत, शांतता भंग करणाऱ्या आणि ध्वनी प्रदूषण वाढवित रस्त्यावऊन धावणाऱ्या मॉडिफाय दुचाकीवर कारवाई करण्याविषयी कोल्हापूर आणि इचलकरंजी शहर वाहतुक नियंत्रण शाखेच्या पोलिसांना व्यापक मोहीम राबवुन कायदेशीर कारवाई करण्याबाबत सक्त आदेश दिला होता. त्यानुसार कोल्हापूर वाहतुक पोलिसांच्याकडून 1 हजार 235 मॉडिफाय दुचाकीवर कारवाई करुन, 701 मॉडिफाय सायलेन्सर जप्त करीत, 12 लाख 33 हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आला.
इचलकरंजी वाहतुक शाखेकडून 36 मॉडिफाय बुलेटच्या सायलेन्सरवर कारवाईचा बडगा उगारला होता. कोल्हापूर व इचलकरंजी शहर वाहतुक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी जप्त केलेल्या 737 मॉडिफाय सायलेन्सरवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर शहरातील दसरा चौकात कोल्हापूर शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्या उपस्थितीत बुलडोजर फिरवून, कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर फोडून टाकले.
- जेष्ठ नागरीकांच्याकडून अशाच पध्दतीच्या मोहिमेची अपेक्षा
मॉडिफाय केलेल्या दुचाकीच्या सायलेन्सर मधून कर्कश आवाज येतो. रस्त्यावऊन कर्णकर्कश आवाज करीत भरधाव वेगाने दुचाकी चालविल्याने पादचारी, जेष्ठ नागरीक आणि लहान मुलाच्या आरोग्यावर आणि सुरक्षितेला धोका निर्माण झाला होता. त्याचबरोबर या मॉडिफाय सायलेन्सरमुळे सार्वजनिक शांततेचा भंग होवून, वायु प्रदुषण होत होते. यांची गांभीर्याने दखल घेवून, मॉडिफाय सायलेन्सर बसविलेल्या दुचाकीवर कोल्हापूर आणि इचलकरंजी शहर वाहतुक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला होता. भविष्यात देखील अशाच पध्दतीने जिह्यात मॉडिफाय सायलेन्सरवर कारवाईची व्यापक मोहित हाती घेण्यात यावी, अशी अपेक्षा जेष्ट नागरीकांच्यामधून व्यक्त होत आहे.
- मॅकॅनिकल, शोरुम मालकावर होणार कारवाई
कोल्हापूर व इचलकरंजी शहर वाहतूक शाखेच्या वतीने सर्व वाहनधारकांना आवाहन करण्यात येते की, दुचाकी वाहनांचे मुळ कंपनीचे सायलेंसर बदलुन, त्या ऐवजी कर्णकर्कश आवाजाचे डुप्लीकेट सायलेंसर बसविण्याबाबत तऊणाईमध्ये क्रेज वाढली आहे. त्यामुळे दुचाकीच्या मुळ सायलेंसर संदर्भाने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकी मालकाविरोधी आणि सायलेन्सर विक्री करणारे विक्रेते, सायलेन्सर बसविणारे मॅकॅनिकल, संबंधीत शोरुम मालक यांच्या विरोधी कारवाईची मोहीम पोलिसांच्याकडून पुढील काळातही व्यापक स्वरुपात हाती घेण्यात येणार आहे. तरी दुचाकी वाहनचालकांनी त्यांच्या दुचाकी वाहनांचे सायलेंसर बदलु नयेत व होणारी कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन कोल्हापूर शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी केले आहे.