बरेली हिंसाचारप्रकरणी बुलडोझर कारवाई
वृत्तसंस्था/ बरेली
सप्टेंबर महिन्यात बरेलीमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणात प्रशासन पुन्हा एकदा सक्रिय झाले आहे. मौलाना तौकीर यांचे जवळचे सहकारी मानले जाणारे मोहम्मद आरिफ यांच्या मालकीच्या दुमजली व्यापार संकुलावर बरेली विकास प्राधिकरणाने रविवारी कडक सुरक्षा व्यवस्थेत बुलडोझर कारवाई केली. जगतपूर परिसरात मोहम्मद आरिफ यांची जवळपास 25 दुकाने आणि पीटर इंग्लंडचे शोरूम असलेल्ााr दुमजली इमारत बेकायदेशीरपणे बांधण्यात आल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
बरेली विकास प्राधिकरणाचे पथक सुरक्षा फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचल्यानंतर कारवाईला सुरुवात झाली. या कारवाईदरम्यान व्यापारी-दुकानदारांनी विरोध केल्यानंतर प्रशासनाने त्यांना त्यांचे सामान हटविण्यासाठी काही तासांचा वेळ दिला. दिलेल्या मुदतीनंतर व्यापार संकुलावर बुलडोझर चालविण्यात आला. या कारवाईवेळी संपूर्ण परिसरात कलम 144 लागू करण्यात आले होते.