अज्ञात वाहनाच्या धडकेत बैल जागीच ठार
03:51 PM Nov 22, 2025 IST
|
अनुजा कुडतरकर
Advertisement
सातार्डा -
Advertisement
सातार्डा - वेंगुर्ले सागरी मार्गांवर अज्ञात अवजड वाहनाने मोकाट फिरणाऱ्या बैलाला धडक दिल्याने बैल जागीच ठार झाला. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या सातार्डा शाखेसमोरच शुक्रवारी मध्यरात्री हा अपघात झाला.अवजड वाहनाने ठोकरल्याने बैलाचा चेंदामेंदा झाला होता.बैल रस्त्यावर मृत्यूमुखी पडल्याने वाहतुकीची समस्या निर्माण झाली होती. मध्यरात्री ग्रामपंचायत सदस्य वासुदेव राऊळ, दत्ताराम सातार्डेकर, गणेश सातार्डेकर, उल्हास कांबळी,पंकज मेस्त्री, साईल पेडणेकर, हर्षद घाडी, सर्वेश मांजरेकर व ग्रामस्थांनी मदतकार्य करून रस्ता वाहतुकीला खुला केला.
Advertisement
Advertisement
Next Article