For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur News | सजावट झाली, बेंजोही ठरला... पण मिरवणुकीपूर्वीच लाडक्या बैलाची एक्झिट; तरुणांना अश्रू अनावर

01:07 PM Jun 30, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur news    सजावट झाली  बेंजोही ठरला    पण मिरवणुकीपूर्वीच लाडक्या बैलाची एक्झिट  तरुणांना अश्रू अनावर
Advertisement

कोल्हापुर - बेंदूर सणाच्या उत्सवासाठी मोठ्या उत्साहात तयारी सुरू असतानाच ऐन सणाच्या दिवशी पहाटे देखण्या बैलाचा अचानक मृत्यू झाल्याने कुरणी गावावर शोककळा पसरली. या घटनेमुळे नियोजित मिरवणुकीचा उत्साह क्षणात दुःखात बदलला.

Advertisement

कुरणी येथील एस. पी. स्पोर्ट्स मंडळाने दरवर्षीप्रमाणे बेंदूर सणाच्या मिरवणुकीसाठी सुमारे 80 हजार रुपये खर्चून आकर्षक बैल खरेदी केला होता. गेल्या पंधरा दिवसांपासून मंडळातील तरुणांनी बैलाची प्रेमाने देखभाल केली होती. त्याच्या खाण्या-पिण्यापासून सर्व व्यवस्थेची विशेष काळजी घेण्यात आली होती.

मिरवणुकीसाठी 30 हजार रुपये खर्चून बेंजो पथक निश्चित करण्यात आले होते, तसेच मंडळाच्या सदस्यांनी 150 टी-शर्ट छापून घेतले होते. नैवेद्यापासून मिरवणुकीपर्यंतची सर्व तयारी पूर्ण झाली होती.मात्र, बेंदूर सणाच्या दिवशी पहाटे बैलाला अंघोळीसाठी नेत असताना तो मृत असल्याचे दिसून आले पशुवैद्यकीय डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले ही बातमी समजताच मंडळातील तरुणांनी एकच टाहो फोडला. अनेकांना अश्रू अनावर झाले.

Advertisement

यानंतर बैलावर विधीवत अंत्यसंस्कार करून त्याला दफन करण्यात आले. बेंदूर सणासाठी तयार केलेला नैवेद्यही त्याच्या समाधीस्थळी अर्पण करण्यात आला. या भावनिक प्रसंगामुळे उपस्थितांचे डोळे पाणावले.कुरणी गावात दरवर्षी बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदाही सर्व तयारी पूर्ण झाली होती. मात्र, एस. एम. स्पोर्ट्स मंडळाच्या बैलाच्या अकाली मृत्यूमुळे संपूर्ण बेंदूर उत्सवावर शोककळा पसरली असून गावभर हळहळ व्यक्त होत आहे.

Advertisement
Tags :

.