For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बिल्डर गौरव बक्षीला अटक

11:18 AM Jul 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
बिल्डर गौरव बक्षीला अटक
Advertisement

मंत्री नीळकंठ हळर्णकरना धमकी प्रकरण

Advertisement

म्हापसा : रेवोडा येथे मूळ दिल्लीतील पण गोव्यात कार्यरत असलेला गौरव बक्षी याने मत्स्योद्योगमंत्री नीळकंठ हळर्णकर यांना धमकी देत त्यांच्या सुरक्षा अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रकार बुधवारी रात्री उशिरा घडल्यानंतर कोलवाळ पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. बुधवारी सायंकाळी 4.15 च्या सुमारास धक्काबुक्कीची घटना घडली. मंत्री हळर्णकर हे रेवाडा पंचायतघरात आयोजित करण्यात आलेल्या रोपवाटप कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी आपली गाडी पंचायत घराच्या समोरील रस्त्यावर पार्क केली होती. या गाडीसमोर संशयित बक्षी याने गाडी पार्क केली होती.

हळर्णकर यांच्या वाहनचालकाने संशयित गौरव बक्षी याला त्याची गाडी बाजूला घेण्यास सांगितले. यावरून त्यांच्यात वाद झाला. हा वाद सुरू असताना मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा गौरव त्यांच्या अंगावर धाऊन गेला आणि त्यांना गंभीर परिणाम होण्याची धमकी दिली. त्यांच्या अंगरक्षक पोलीस अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केली. घटनेची माहिती मिळताच कोलवाळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बक्षी याला पोलीस स्थानकावर बोलावले. मंत्री हळर्णकर यांच्या अंगरक्षक पोलीस अधिकाऱ्याने पोलीस स्थानकात तक्रार दिली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या अंतर्गत गौरव बक्षी याच्याविरोधत गुन्हा नोंद केला आहे. बक्षी यांनीही तक्रार दिली आहे. पुढील तपास निरीक्षक विजय राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.

Advertisement

मंत्र्यांनी धमकी दिल्याचा बक्षीचा आरोप

आपण बांधकाम परवान्यासाठी रेवोडा पंचायत कार्यालयात गेलो होतो. तिथे मंत्री नीळकंठ हळर्णकर यांची गाडी होती. त्यांच्या गाडीचालकाला आपण त्यांची गाडी बाजूला घेण्यास सांगितले. तरीही त्यांनी गाडी न काढता आपल्याशी वाद घातला. नंतर मंत्री हळर्णकर यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्याला धमकी दिली, असे गौरव बक्षी याने तक्रारीत म्हटले आहे. मंत्री नीळकंठ हळर्णकर म्हणाले की, रेवोडा येथे मूळ दिल्लीस्थित गौरव बक्षी याने कोणतेही कारण नसताना आमची गाडी अडवली. शिवाय आपल्या ओएसडीला फोन करून पंतप्रधान कार्यालयात आपली ओळख असल्याचे सांगत धमकी देण्याचा प्रयत्न केला. संशयितावर पोलीस कायदेशीर कारवाई करतील.

Advertisement
Tags :

.