तिरोडा - खासेवाडीत जाण्यासाठी नव्याने साकव उभारा
03:47 PM Jun 03, 2026 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
प्रवीण भोसलेंचे कार्यकारी अभियंता पूजा इंगवले यांना निवेदन
Advertisement
सावंतवाडी -
तिरोडा-खासेवाडी येथे जाणारा लोखंडी साकव नादुरुस्त झाल्याने तो तात्काळ दुरुस्त करण्यात यावा, अन्यथा त्या ठिकाणी नवीन साकव उभारण्यात यावा, अशी मागणी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी सावंतवाडी बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पूजा इंगवले यांच्याकडे केली. दरम्यान काही तांत्रिक बाबी आहेत. त्या दूर करून त्या ठिकाणी नव्याने साकव उभारण्यात येईल, त्यासाठी आवश्यक असलेले अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरू आहे, असे आश्वासन इंगवले यांनी या शिष्टमंडळाला दिले. श्री. भोसले यांच्या नेतृत्वाखाली ही भेट घेण्यात आली.यावेळी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
Advertisement
Advertisement