For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

म्हैस पळविण्याची शर्यत उत्साहात

12:15 PM Mar 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
म्हैस पळविण्याची शर्यत उत्साहात
Advertisement

धामणे : सुळगा (ये.) येथे मोटारसायकलबरोबर म्हैस पळविण्याची जंगी शर्यत रविवार दि. 9 रोजी उत्साहात पार पडली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते पूजन करून नारळ फोडण्यात आला. याप्रसंगी गोपाळ पाटील, प्रकाश नावगेकर, जयदेव कुकडोळकर, शशी जलगार, संतोष पाटील, शुभम नावगेकर आणि गवळी संघटना बेळगाव आदी उपस्थित होते. बेळगाव, शहापूर, वडगाव, जुने बेळगावसहीत ग्रामीण भागातील म्हैस मालकांनी सहभाग घेतला होता. या शर्यतीत सिद्धेश्वर प्रसन्न (कणबर्गी) यांनी प्रथम क्रमांक, दुसरा क्रमांक काळभैरव प्रसन्न (कणबर्गी) तर लहान गटातील नंद्याळकर (मंडोळी) यांच्या वासराने प्रथम क्रमांक तर समर्थ ताशिलदार (रूक्मीणीनगर) यांच्या वासराने दुसरा नंबर मिळविला. सुळग्यात मोटारसायकलबरोबर म्हैस पळविण्याची शर्यत यंदा पहिल्यांदाच आयोजित केली असल्याने गावात उत्साही वातावरण दिसून आले.

Advertisement

Advertisement
Tags :

.