For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बुधाजी कासार यांना राजर्षी छ. शाहू महाराज समाज भूषण पुरस्कार प्रदान

बुधाजी कासार यांना राजर्षी छ  शाहू महाराज समाज भूषण पुरस्कार प्रदान
Advertisement

विद्यार्थी विकास अकादमीचा पुरस्कार

Advertisement

ओटवणे : प्रतिनिधी

सावंतवाडी एसटी आगाराचे चालक तथा वाहक बुधाजी लक्ष्मण कासार यांच्या उत्कृष्ट प्रवासी सेवेसह त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना विद्यार्थी विकास अकादमीचा राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाज भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीचे औचित्य साधून राजर्षी छत्रपती शाहू महाराज गौरव समितीच्यावतीने त्यांना हा पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.माजगाव कासारवाडा येथील बुधाजी कासार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सेवेत कार्यरत असतांनाच समाजसेवा, शिक्षण, सामाजिक समता, बहुजन कल्याण, स्त्री सक्षमीकरण, पर्यावरण संवर्धन, साहित्य, कला, संस्कृती अथवा इतर सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय, प्रेरणादायी व जनहितकारी कार्याची दखल घेऊन तसेच सामाजिक न्याय, समता आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाजपरिवर्तन घडवून आणणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा त्यांनी आपल्या कार्यातून जपला. त्यांच्या या कार्यामुळे समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडत असून अनेकांना प्रेरणा मिळत आहे. त्यामुळे त्यांची राजश्री छत्रपती शाहू महाराज समाजभूषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

Advertisement

Advertisement
Tags :

.