For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निर्मला सीतारामन यांच्याकडून बजेट सादर, महत्वाचे मुद्दे

01:08 PM Jul 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
निर्मला सीतारामन यांच्याकडून बजेट सादर  महत्वाचे मुद्दे
Advertisement

मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममधील पहिल्या अर्थसंकल्पातील तरतुदी

Advertisement

  • प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ
  • बजेटमध्ये रोजगार, कौशल्य आणि MSME यावर फोकस
  • अंतरिम बजेटमध्ये गरीब, महिला, युवा आणि शेतकरी या चार जातींवर लक्ष केंद्रीत
  • आंध्र प्रदेशला अतिरिक्त 15 हजार कोटीचा निधी,बिहारमध्ये रस्ते बांधणासाठी 26 हजार कोटी
  • रोजगार आणि कौशल्य विकास प्रशिक्षणाशी संबंधित 5 योजनांसाठी 2 लाख कोटींची तरतुद
  • खाद्य गुणवत्ता तपासणीसाठी 100 लॅब उघडणार.
  • 3O लाख तरुणांच्या रोजगारासाठी केंद्र सरकारची योजना.
  • 500 कंपन्यांमध्ये इंर्टनशिप देणार, 5 हजार महिना मिळणार.
  • नवे व्यवसाय करण्यासाठी तरुणांना कर्ज उपलब्ध करुन देणार.
  • 100 शहरांमध्ये स्वच्छ पाणी पुरवठा करण्यासाठी योजना.
  • मुद्रा लोनची मर्यादा आता 20 लाख रुपये.
  • महिला, मुलींसाठी 3 लाख कोटीच्या योजना.
  • प्रधानमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-4 ची घोषणा.
  • पायाभूत सुविधांसाठी 11 लाख कोटींचा निधी देण्यात येणार.
  • 1 कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन देणार.
  • काशी विश्वनाथ कॉरिडोअरसाठी विशेष, अधिकच्या निधीची तरतूद.
  • हिंदू, बौद्ध, जैन धर्मस्थळांचा विकास करण्यात येणार.
  • नालंदा विद्यापीठात टुरिरस्ट केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न.
  • कृषी क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटींची तरतुदी
  • ग्रामीण भागातील जमिनीच्या नोंदींच डिजिटलायजेशन करणार.
  • 1 लाख रुपयापेक्षा कमी सॅलरी असणाऱ्यांना EPFO मध्ये पहिल्यांदा रजिस्टर होणाऱ्यांना तीन टप्प्यात 15 हजार रुपये मिळतील.
  • राज्यांना बिनव्याजी 15 हजार कोटी कर्ज देणार.
  • देशभरात 12 नवीन इंडस्ट्रीयल पार्क उभारण्यात येणार.
  • सूर्य घर योजनेत 1 कोटी घरांना सौर ऊर्जा पॅनल देणार. 300 युनिट पर्यंत मोफत वीज देणार.
  • विष्णुपद मंदिर आणि महाबोधी मंदिराला काशी विश्वनाथच्या धर्तीवर विकसित केलं जाईल. त्यांनी इथे कॉरिडोर बनवण्याची घोषणा केली आहे.
  • कॅन्सरची तीन औषध स्वस्त होणार. या औषधांवर कस्टम ड्युटी लागणार नाही.
  • सोने-चांदी स्वस्त होणार. सोने आणि चांदीवरील सीमा शुल्क 6 टक्क्यांनी घटवला.
  • महिलांसाठी स्टॅम्प ड्युटीमध्ये बदल करणार.
  • इलेक्ट्रिक वाहन स्वस्त होणार.
  • मोबाईल, चार्जर स्वस्त होणार.
Advertisement
Tags :

.