For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बुडाला एक इंचही जमीन देणार नाही

10:50 AM Jan 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
बुडाला एक इंचही जमीन देणार नाही
Advertisement

कणबर्गी येथील सिद्धेश्वर शेतकरी संघटनेच्यावतीने बुडा आयुक्तांना निवेदन

Advertisement

बेळगाव : नगरविकास विभाग जिल्हा प्रशासन कणबर्गी योजना क्र. 61 मधील 50 एकर जमिनीचा न्यायालयात वाद असला तरी सातत्याने बुडाकडून सर्व्हेसाठी प्रयत्न होऊ लागले आहेत. मात्र बुडाला एक इंचही जमीन देणार नाही, असा पवित्रा कणबर्गी येथील सिद्धेश्वर शेतकरी संघटनेने घेतला आहे. शिवाय याबाबत बुडा आयुक्तांना निवेदन सादर केले आहे. योजना क्र. 61 मधील 25 एकर जमिनीचा निकाल शेतकऱ्यांचा बाजूने लागला आहे असे असले तरी बुडाकडून भू-संपादनासाठी सातत्याने प्रयत्न होऊ लागला आहे. उच्च न्यायालयात शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल लागूनदेखील सर्व्हेसाठी तगादा लावला जात आहे. मागील आठवड्यात सर्व्हेसाठी आलेल्या बुडा अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी धुडकावून लावले आहे. शिवाय भू-संपादनाला आपला कायम विरोध राहील, असे ठणकावून सांगितले आहे.

17 वर्षांपासून शेतकऱ्यांचा लढा

Advertisement

जमीन वाचविण्यासाठी मागील 17 वर्षांपासून शेतकऱ्यांनी लढा उभा केला आहे. मात्र बुडाकडून सातत्याने भू-संपादनासाठी प्रयत्न होऊ लागले आहेत. याला विरोध करत शेतकऱ्यांनी जमिनीवर पायदेखील ठेवू देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. शिवाय बुडाने आराखडा दाखवूनच निविदा काढावी अन्यथा बुडा कार्यालयाला घेराव घालू, असा इशारादेखील शेतकऱ्यांनी दिला आहे. शेतकऱ्यांना अंधारात ठेऊन आराखडा तयार केला जात आहे. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत.

Advertisement
Tags :

.