‘बीएसएनएल’च्या आयएफटीव्ही सेवेचा प्रारंभ
नवी दिल्ली :
भारताची एकमेव सरकारी दूरसंचार कंपनी भारत दूरसंचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) यांनी आता आपली आयएफटीव्ही सेवा सुरु केली आहे. यामध्ये बीएसएनएल ग्राहकांना विना सेटअप बॉक्सचे 500 पेक्षा अधिकचे टीव्ही चॅनेल्स मोफत पाहता येणार आहेत. या सर्व्हिसमध्ये बीएसएनएल ग्राहक ब्रॉडबॅण्ड कनेक्शनवर एचडी दर्जामध्ये लाईव्ही टीव्ही चॅनेल्स बघता येणार असल्याची माहिती आहे. यासह बीएसएनएलच्या या आयएफटीव्हीला आपल्या जुन्या एलसीडी किंव्हा एलईडी टीव्हीवर वापरता येणार आहे.
सध्या ‘या’ राज्यात सुरु होणार सेवा
बीएसएनएलची आयएफटीव्ही सर्व्हिस ही फक्त गुजरात या राज्यात सुरु करण्यात आली आहे. यामुळे लवकरच संपूर्ण देशात बीएसएनएलची आयएफटीव्ही सेवा कार्यरत करण्यात येणार असल्याची माहिती आहे. या अगोदर मध्य प्रदेश, तामिळनाडू आणि पंजाब या ठिकाणी ही सेवा सादर करण्यात आली आहे.
नव्या सेवेची मागील वर्षीच घोषणा
मागील वर्षात आयोजित करण्यात आलेल्या मोबाईल काँग्रेसमध्ये बीएसएनएलने आपली ही सेवा सादर करण्याची घोषणा केली होती. इतकेच नाही तर बीएसएनएलने मागील काही दिवसांमध्ये पुडुचेरीमध्ये डायरेक्ट टू मोबाईल ही सर्व्हिस बीआयटीव्ही सादर केली होती. बीआयटीव्हीमध्ये मोबाईल ग्राहकांना 300 पेक्षा जादा लाईव्ह टीव्ही चॅनेल्स सेवेत दिले आहेत.