बीएसएनएलच्या ‘बीआयटीव्ही’ची सेवा देशभर सुरु
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशातील बीएसएनएल ही एकमेव सरकारी मालकीची दूरसंचार कंपनी आहे. यावेळी कंपनीने नव्या क्षेत्रात पदार्पण केले असून जवळपास कोट्यावधी वापरकर्ते बीएसएनएलमध्ये सामिल झाले आहेत. कंपनीने एक विशेष सेवा आपल्या ग्राहकांसाठी सुरु केली आहे. ही सेवा बीएसएनएलची डायरेक्ट टू मोबाईल टीव्ही सेवा बीआयटीव्ही आहे. या अगोदर ही सेवा कंपनीने पु•gचेरीमध्ये सुरु केली होती, परंतु आता बीएसएनएलने ही सेवा संपूर्ण भारतात सुरु केली आहे.
बीएसएनएलने आपल्या बीआयटीव्ही सेवेसाठी ओटीटी अॅग्रीगेटर ओटीटी प्लेशी भागीदारी केली आहे. या अंतर्गत बीएसएनएल वापरकर्ते त्यांच्या मोबाईलवर अनेक ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रवेश करु शकतात. या सेवेमध्ये त्यांच्या फोनवरच जवळपास 300 हून अधिकचे टीव्ही चॅनेल्स विनामूल्य पाहता येणार आहेत. यावर चित्रपट आणि वेब सीरीजचा आनंद घेता येणार आहे. यासाठी वापरकर्त्यांना अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.
एक्सवर पोस्ट
बीएसएनएलने एक्सवरील एका पोस्टमध्ये संपूर्ण भारतात आपली बीआयटीव्ही सेवा सुरु करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने बीएसएनएल बीआयटीव्ही अधिकृतपणे संपूर्ण भारतात सुरु करत असल्याची घोषणा केली आहे.
कंपनीची आयएफटीव्ही सेवाही लवकरच
लवकरच कंपनी देशभरात त्यांची आयएफटीव्ही सेवा देखील सुरु करणार आहे. सध्या ही सेवा देशातील काही राज्यांमध्ये उपलब्ध आहे. बीएसएनएल आयएफटीव्ही सेवेअंतर्गत, वापरकर्ते सेटटॉप बॉक्सशिवाय 500 हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनेल्स पाहु शकणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.