बीएसएनएलच्या 4 जी नेटवर्कला मिळाला वेग
65,000 हून अधिक 4 जी टॉवर्स झाले सुरु : आता सुपर फास्ट इंटरनेट सुविधा मिळणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतातील एकमेव सरकारी मालकीची दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) आपल्या 4जी नेटवर्कमध्ये वेगाने विस्तार करत आहे. या वर्षी बीएसएनएल आपली 4जी सेवा पूर्णपणे सुरू करेल, त्यानंतर वापरकर्त्यांना चांगला अनुभव मिळणार असल्याचा दावाही यावेळी कंपनीने केला आहे. बीएसएनएलनेही आपल्या 5जी नेटवर्कवर काम सुरू केले आहे. 4जी नेटवर्कनंतर, बीएसएनएल वापरकर्त्यांना लवकरच 5जी सेवेचा लाभ देणार असल्याचे लाखो वापरकर्त्यांना कंपनीने सांगितले आहे.
बीएसएनएलचे 65,000 हून अधिक 4जी
टॉवर्स सुरू झाले आहेत. अशा प्रकारे बीएसएनएल वापरकर्त्यांना आता चांगली नेटवर्क कनेक्टिव्हिटी मिळणार असल्याचेही सरकारी कंपनीने स्पष्ट केले आहे.
65,000 हून अधिक 4जी टॉवर्स सुरू
बीएसएनएलने आपल्या एक्स हँडलवर पोस्ट करत घोषणा केली आहे की, 65,000 हून अधिक 4जी टॉवर्स सुरू केले जातील. एका पोस्टमध्ये, बीएसएनएलने म्हटले आहे की, वापरकर्त्यांना आता चांगली कनेक्टिव्हिटी आणि नेटवर्क कव्हरेज मिळेल. या वर्षी, बीएसएनएल देशभरात व्यावसायिकरित्या त्यांची 4जी सेवा सुरू करेल. बीएसएनएल देखील त्यांच्या 5 जी नेटवर्कची चाचणी घेत आहे. बीएसएनएलने यासाठी टाटासोबत भागीदारी केली आहे. बीएसएनएल 3 जी सेवा टप्प्याटप्प्याने बंद केली जात आहे बीएसएनएल कंपनी 3 जी नेटवर्क टप्प्याटप्प्याने बंद करत आहे, जेणेकरून 4 जी आणि 5 जी टॉवर स्थापित करता येतील. बीएसएनएलने बिहार टेलिकॉम सेवेमध्ये 3 जी सेवा टप्प्याटप्प्याने बंद केली आहे. वापरकर्त्यांना आता 3 जी ऐवजी 4 जी कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.