कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

न्हावेलीत बीएसएनएल सेवा विस्कळीत

05:40 PM May 07, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

तात्काळ सेवा न सुधारल्यास ग्रामस्थांचा तीव्र आंदोलनाचा इशारा…..

Advertisement

न्हावेली / वार्ताहर
न्हावेलीमध्ये गेले एक महिना बीएसएनएल सेवा विस्कळीत झाली असून मोबाईल बीएसएनएल नेटवर्क ग्राहकांना नेटवर्क समस्येमुळे अनेक अडचणींना समोरे जावे लागत आहे. नेटवर्क कव्हरेज कमकुवत असल्यामुळे आवाज अस्पष्ट येणे यासारख्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे बीएसएनएल अधिकाऱ्यांनी याकडे तात्काळ लक्ष देत सेवा सुरळीत करण्याची मागणी न्हावेली ग्रामस्थांनी आज सावंतवाडीत बीएसएनएल अधिकाऱ्यांची भेट घेऊन केली.इंटरनेट आणि मोबाईल फोन कनेक्विव्हिटी हे आजच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे.परंतु न्हावेलीमध्ये गेले आठ दिवसांपासून सतत खंडित होणाऱ्या बीएसएनएलच्या इंटरनेट सेवेमुळे वर्क फॅार्म होम करणाऱ्या नोकरदार वर्गाला कामात व्यत्यय येत आहे. तसेचं अत्यावश्यक वेळी फोन करणे सुद्धा कठीण होत आहे. त्यामुळे रिचार्ज करुन सर्व खर्च वाया जात असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. नैसर्गिक आपत्तीवेळी फोन करावयाचा झाल्यास आम्हाला घरापासून दूरवर जावे लागते. त्यामुळे जवळपास असलेल्या टॅावरची नेटवर्क क्षमता वाढविण्याची मागणी न्हावेली ग्रामस्थांनी केली आहे.यावेळी शिवसेना शिंदे गट उपविभागप्रमुख सागर धाऊसकर,माजी ग्रामपंचायत उपसरपंच विशाल गावडे, लक्ष्मण धाऊसकर,नीलेश परब,सागर नाईक,आयुष नाईक,रघुनाथ परब आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg# news update # konkan update # marathi news #
Next Article