महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

ग्राहक आयुक्त खंडपीठासाठी बीएसएनएल इमारत

09:59 AM Dec 07, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अहिंद वकील संघटनेच्या आंदोलनाला यश

Advertisement

बेळगाव : बेळगाव ग्राहक आयुक्त खंडपीठाला मंजुरी देण्यात आली होती. मात्र इमारत नसल्यामुळे आयुक्त खंडपीठ चालविणे अवघड झाले होते. गेल्या दोन वर्षांपासून यासाठी पाठपुरावा करण्यात आला होता. तरी देखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अहिंद संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले. त्यानंतर तातडीने आयुक्त खंडपीठासाठी बीएसएनएल कार्यालयाच्या इमारतीला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे दिलासा मिळाला आहे. बेळगावात ग्राहक आयुक्त खंडपीठ मंजूर केल्यामुळे 8 जिल्ह्यांना त्याचा फायदा होणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून इमारत उपलब्ध करावी यासाठी मागणी करण्यात आली होती. सार्वजनिक बांधकाम खात्याने आता या खंडपीठासाठी बीएसएनएलची इमारत देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आठ जिल्ह्यातील ग्राहकांना त्याचा फायदा होणार आहे.

Advertisement

आता बेळगावातच न्याय मिळणार

आता इमारत मंजूर करण्यात आली आहे. मात्र त्या ठिकाणी तातडीने आयुक्त खंडपीठ सुरू करावे, अशी मागणी होत आहे. येथील जिल्हा ग्राहक न्यायालयाने निकाल दिल्यानंतर ग्राहकांना अपिल करायची असेल तर बेंगळूरला धाव घ्यावी लागत होती. मात्र आता याच ठिकाणी ग्राहकांना न्याय मिळणार आहे. त्यामुळे दिलासा मिळाला आहे. या इमारतीसाठी अॅड. एन. आर. लातूर यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. पालकमंत्री सतीश जारकीहोळी तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी अखेर खंडपीठाला जागा उपलब्ध करून दिल्यामुळे त्या सर्वांचे आभार मानण्यात आले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article