महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

चार महानगरांमध्ये ‘बीएसएनएल’4-जी सेवा

06:37 AM Jul 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुख्य महानगरांसह  राजधानांच्या ठिकाणीही सेवा कार्यरत राहणार

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने सुमारे 12,000 4जी टॉवर स्थापित केले आहेत आणि 2024 च्या अखेरीस देशभरात 4 जी सेवा आणि पुढील वर्षाच्या सुरुवातीला 5 जी सेवेचा प्रारंभ करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. असे बीएसएनएलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या चार प्रमुख शहरांमध्ये 4 जी सेवा अगोदरच सुरु केली आहे.

याशिवाय अहमदाबाद, हैदराबाद, जयपूर, लखनौ, रायपूर आणि चंदीगड यांसारख्या बहुतांश राज्यांच्या राजधानीत 4 जी सेवा उपलब्ध आहे. सप्टेंबरच्या अखेरीस उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, सिक्कीम आणि ईशान्य भारत सारख्या डोंगराळ राज्यांमधील बहुतेक जुने मोबाइल टॉवर 4 जी सक्षम करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

सरकारने बुधवारी संसदेत सांगितले की, मार्चच्या अखेरीस, बीएसएनएलचे देशभरात 67,340 टॉवर होते आणि खासगी दूरसंचार कंपन्यांना 12,502 टॉवर भाड्याने दिले होते. एका अधिकाऱ्याने सांगितले की, दूरसंचार कंपनी 2025 च्या सुरुवातीला सुरू होणाऱ्या 5जी सेवांसाठी पायाभूत सुविधा तयार करण्यावरही काम करत आहे.

ते म्हणाले की, दूरसंचार विभागाने दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि दूरसंचार सचिव नीरज मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली बीएसएनएलसाठी एक प्रोजेक्ट मॉनिटरिंग युनिट तयार केले आहे, ज्यामुळे कामाला गती मिळेल अशी अपेक्षा आहे.

बीएसएनएलची 4 जी सेवा सुरू होण्यास बराच विलंब झाला आहे. रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या तीन खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी ही सेवा आधीच सुरू केली होती. 2जी वरून 4जी कडे स्थलांतरित झालेल्या ग्राहकांनी इतर कंपन्यांकडे स्विच केल्यामुळे  बीएसएनएलची ग्राहक संख्या 86.32 कोटींवर घसरली आणि मे अखेरीस त्याचा बाजार हिस्सा 7.4 टक्क्यांवर आला.

या आठवड्याच्या सुरुवातीला, बीएसएनएलसाठी 2024 (आर्थिक वर्ष 2024-25 साठी) बजेटमध्ये 82,916 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती, जी अंतरिम बजेटमध्ये केलेल्या वाटपाप्रमाणेच आहे. यातील बहुतांश भाग बीएसएनएलच्या नेटवर्क विस्तार योजनांना निधी देण्यासाठी आणि उपकरणांसाठी पैसे देण्यावर जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#business#social media
Next Article