For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बीएसएफ जवानाची गळफास घेऊन आत्महत्या

12:46 PM Jul 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
बीएसएफ जवानाची गळफास घेऊन आत्महत्या
Advertisement

बेळगाव : बीएसएफमध्ये सेवा बजाविणाऱ्या एका जवानाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना विजयनगर-हिंडलगा येथे बुधवारी सकाळी घडली आहे. कॅम्प पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. दगडू महादेव पुजारी (वय 45, मूळचे रा. शेडबाळ स्टेशन, ता. कागवाड) असे त्या जवानाचे नाव आहे. दगडू आसाममध्ये सेवा बजावत होता. सहा दिवसांपूर्वी तो रजेवर आला होता. तो हर्नियाने त्रस्त होता. उपचार करण्यासाठी तो बेळगावला आला होता. त्याने आपल्या बेडरुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे बुधवार दि. 2 जुलै रोजी सकाळी 6.30 वाजता उघडकीस आले आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

Advertisement

Advertisement
Tags :

.