For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Pune Crime | तोंडात बोळा कोंबल्याने पीडितेचा गुदमरून मृत्यू

01:03 PM May 06, 2026 IST | NEETA POTDAR
pune crime   तोंडात बोळा कोंबल्याने पीडितेचा गुदमरून मृत्यू
Advertisement

                नसरापूरच्या त्या मुलीच्या मृत्यूचं क्रूर गुपित अखेर समोर!

Advertisement

पुणे : नसरापूर घटनेच्या पार्श्वभूमीवरपुणे शहर पोलिसांनी १० वर्षांतील गुन्हेगारी नोंदी तपासत ३७ असे सराईत गुन्हेगार शोधले आहेत. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केल्याची माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख यांनी दिली.

दरम्यान, शवविच्छेदन अहवालानुसार मुलीचा मृत्यू गुदमरल्याने झाला आहे. आरोपीने मुलीच्या तोंडात बोळा कोंबून तिला मारल्याचे निष्पन्न झाले आहे.पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी सांगितले, की शवविच्छेदन अहवालानुसार मुलीचा मृत्यू गुदमरल्याने झाला आहे. आरोपीने मुलीच्या तोंडात कापडाचा बोळा कोंडून तिला मारल्याची माहिती समोर आली आहे. तसेच तिच्या डोक्यावरही जखमा आढळल्या आहेत. धक्कादायक बाबम्हणजे आरोपी कांबळे याला यापूर्वी दोन लैंगिक अत्याचाराच्या गुन्ड्यात अटक झाली होती. मात्र त्यातून त्याची निर्दोष मुक्तता झाली होती.

Advertisement

१९३ गुन्हेगारांची यादी
पुणे शहर पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत आणखी १९३ अशा व्यक्तींची ओळख पटली आहे,ज्यांच्यावर लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांसोबतच चोरी आणि शरीराविरुद्धच्या इतर गंभीर गुन्ड्यांची नोंद आहे. या सर्व गुन्हेगारांची नावे आणि पत्ते संबंधित स्थानिक पोलीस ठाण्यांना कळवण्यात आले आहेत.

अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख म्हणाले, 'या गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेची कारवाई केली जाईल. यामध्ये त्यांना १५ दिवस ते एक महिन्यापर्यंत कारागृहात ठेवले जाऊ शकते. याशिवाय त्यांच्याकडून चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र लिहून घेतले जाईल, असे अतिरिक्त आयुक्त पंकज देशमुख यांनी स्पष्ट केले.

Advertisement
Tags :

.