देवरहिप्परगीत पत्नीची निर्घृण हत्या
24 दिवसांनंतर प्रकरण उघडकीस : मृतदेह घराच्या अंगणातच पुरला
वार्ताहर/विजापूर
विजापूर जिह्यातील देवरहिप्परगी येथे पतीने पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह घराच्या अंगणात पुरल्याची धक्कादायक घटना 24 दिवसांनंतर उघडकीस आली आहे. मृत पत्नीचे नाव सरोजिनी रत्नाकर (वय 45) असे असून आरोपी पती प्रभू रत्नाकर (वय 46) याला पोलिसांनी अटक केली आहे. प्रभू रत्नाकर याने पत्नी सरोजिनीच्या नावावर मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले होते. कर्जाच्या कारणावरून पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत होते. गेल्या 23 जानेवारीच्या रात्री झालेला वाद विकोपाला गेला आणि 24 जानेवारी रोजी प्रभू रत्नाकर याने पत्नीच्या डोक्यावर धारदार हत्याराने वार करून तिची हत्या केली, अशी माहिती समोर आली आहे. त्यानंतर त्याने मृतदेह घराच्या अंगणात पुरला होता. 2 फेब्रुवारी रोजी प्रभू यानेच देवरहिप्परगी पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. तपासादरम्यान पोलिसांना त्याच्या वागणुकीवर संशय आल्याने सखोल चौकशी करण्यात आली.