महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

मालमत्तेच्या वादातून स्वामीजींची निर्घृण हत्या

06:02 AM Jun 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

तिघांना अटक : कोलार जिल्ह्यातील घटना

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisement

मालमत्तेच्या वादातून दोन स्वामीजींच्या गटात झालेल्या भांडणात एका ज्येष्ठ स्वामीजींची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. कोलार जिल्ह्याच्या मालूर तालुक्यातील संतळ्ळी येथील आनंद मार्ग आश्रमात शनिवारी ही घटना घडली. आचार्य चिन्मयानंद (वय 65) असे खून झालेल्या स्वामीजींचे नाव आहे. दोन गटात झालेल्या भांडणाचे पर्यवसान खुनात झाले आहे. या खूनप्रकरणी धर्म प्राणानंद, प्राणेश्वरानंद आणि अरुण कुमार या तिघांना मालूर पोलिसांनी अटक केली आहे.

आचार्य धर्म प्राणानंद यांच्या गटाने स्वामीजींची हत्या केली आहे. याप्रकरणी मालूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हैसूरमध्ये साहाय्यकानेच स्वामीजींची निर्घृण हत्या केल्याची घटना ताजी असतानाच आणखी एका स्वामीजींचा खून करण्यात आल्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, संतळ्ळी गावात चार एकर जागेवर आश्र्रम असून अनेक वर्षांपासून जमिनीचा वाद सुरू आहे. शनिवारी सकाळी आश्रमात अंघोळ करत असताना आचार्य चिन्मयानंद स्वामीजींना संशयितांनी बाहेर ओढून आणले. तसेच काठीने जीवघेणा हल्ला केल्याचे समजते. या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आचर्य चिन्मयानंद स्वामीजींना स्थानिकांनी आर. एल. जलप्पा ऊग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचाराचा उपयोग न झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. याची माहिती मिळताच जिल्हा पोलीस वरिष्ठाधिकाऱ्यांनी आश्रम आणि रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article